चोरीच्या सात मोटारसायकली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 21:48 IST2020-03-01T21:47:58+5:302020-03-01T21:48:03+5:30

रावेर : तालुक्यातील केºहाळा बुद्रूक येथील मोटारसायकल चोरीच्या तपासात पकडलेल्या आरोपीच्या माध्यमातून लंपास केलेल्या २ लाख ४२ हजार किमतीच्या ...

Seven stolen motorcycles seized | चोरीच्या सात मोटारसायकली जप्त

चोरीच्या सात मोटारसायकली जप्त


रावेर : तालुक्यातील केºहाळा बुद्रूक येथील मोटारसायकल चोरीच्या तपासात पकडलेल्या आरोपीच्या माध्यमातून लंपास केलेल्या २ लाख ४२ हजार किमतीच्या सात मोटारसायकली जप्त केल्या.
केºहाळे येथील अमर जगन्नाथ पाटील यांची १२ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक नीलेश चौधरी हे करीत होते.
दरम्यान, या गुन्ह्यातील तपासात पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे नेतृत्वाखालील पो. हे. कॉ. राजेंद्र राठोड, पो. ना. नीलेश चौधरी, पो. कॉ. संदीप धनगर, पो. कॉ. नरेंद्र बाविस्कर व पो. कॉ. मंदार पाटील यांच्या पथकाने संशयावरून आरोपी अरमान अजित तडवी (रा. लालमाती ता.रावेर) यास २७ फेब्रुवारी रोजी अटक केली. सदर आरोपीस रावेर न्यायालयात उभे केले असता न्या. आर एल राठोड यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपीची सखोल चौकशी केली असता सात मोटार सायकली चोरल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. संबंधित मोटारसायकल मालकांनी आपला मालकीहक्क सिध्द करणारे पुरावे सादर करून मुद्देमाल ताब्यात घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी केले आहे.

Web Title: Seven stolen motorcycles seized