सात लाखांचा मद्यसाठा जप्त
By Admin | Updated: September 2, 2014 16:52 IST2014-09-02T16:47:48+5:302014-09-02T16:52:51+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्थानिक विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता मुंबई-आग्रा रस्त्यावरील मुंगसे गावाजवळ एमएच १२एफसी ९९२२ ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला असल्याची माहिती मिळाली.

सात लाखांचा मद्यसाठा जप्त
या विभागाच्या भरारी पथकातील दुयम निरीक्षक डी.टी. शेवाळे यांना आव्हाणे शिवारातील राजाराम नगरातील एका पांढर्या रंगाच्या घरात विदेशी मद्यसाठा साठविला असल्याची गुप्त माहिती मिळाली. या घरावर छापा टाकला. या कारवाईत पथकाला विना परवाना विदेशी बनावटीचा सहा लाख ९१ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळला. या कारवाईत पथकाने तीन जणांना अटक केली .
दोघांना ६ पर्यंत पोलीस कोठडी
या तिघांना पथकाने न्या.ए.एम. मानकर यांच्या कोर्टात हजर केले. सरकार पक्षातर्फे अँड.राजेश गवई यांनी सादिक शेख अब्दुल ललित (वय-३४, रा.सिडको, नाशिक) व मधुकर बाबूराव बर्गे (५२, रा.अशोकस्तंभ, नाशिक) या दोघांच्या १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली तर भगवान जाधव ( ६५, रा. आडगाव, नाशिक) यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांना ६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर भगवान जाधव याची रवानगी कारागृहात केली. आरोपींतर्फे अँड. सतीश पाटील यांनी काम पाहिले.