भुसावळात सव्वा लाखांची बेकायदा दारू जप्त
By Admin | Updated: June 1, 2017 12:40 IST2017-06-01T12:40:25+5:302017-06-01T12:40:25+5:30
दोघांविरुद्ध गुन्हा : नीलोत्पल यांची कारवाई
भुसावळात सव्वा लाखांची बेकायदा दारू जप्त
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.1 - राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल पंजाब खालसा सरपंचदा ढाब्यातील एक लाख 16 हजार 950 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली़ गुरुवारी पहाटे तीन वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने ही कारवाई केली़
सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांना ढाब्यात दारूचा साठा केला असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी पथकाला सोबत घेत भल्या पहाटे ही कारवाई केली़
या प्रकरणी प्रशांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुनील पंचमसिंग राजपूत (40) व सारंग महादेव पाटील (दोन्ही रा़भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ दरम्यान राजपूत यास पहाटेच अटक करण्यात आली़
देशी-विदेशी दारू
जप्त करण्यात आलेल्या दारूमध्ये 71 हजार 840 रुपये किंमतीच्या मॅकडोल व्हिस्कीच्या 449 बाटल्या, 30 हजार 680 रुपये किंमतीच्या टँगोपंचच्या 490 बाटल्या तसेच 14 हजार 430 रुपये किंमतीच्या डिप्लोमॅट कंपनीच्या 111 बाटल्या अशी एकूण एक लाख 16 हजार 950 रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली़