कुलूप तोडून घेतला सेवादल कार्यालयाचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST2021-05-12T04:16:52+5:302021-05-12T04:16:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेस सेवा दलाचे महानगराध्यक्ष कैलास महाजन यांनी काँग्रेस भवनातील सेवा दलाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून ...

Sevadal broke the lock and took possession of the office | कुलूप तोडून घेतला सेवादल कार्यालयाचा ताबा

कुलूप तोडून घेतला सेवादल कार्यालयाचा ताबा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काँग्रेस सेवा दलाचे महानगराध्यक्ष कैलास महाजन यांनी काँग्रेस भवनातील सेवा दलाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून मंगळवारी ताबा घेतला. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या गटातटाच्या राजकारणाने ही जागा धूळखात पडली होती, असा आरोप त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

वेळोवेळी याबाबत ॲड. संदीप पाटील यांना वेळोवेळी लेखी निवेदन दिले हाेते, शिवाय सेवा दलाचे महानगर प्रमुख व जिल्हा प्रमुख यांनी त्यांचे प्रश्न हे पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहेत. प्रदेशाध्यक्षांनी कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घ्यावा, कामकाज करावे, असे आदेश दिल्याचे महाजन यांनी पत्रकात म्हटले आहे. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे या कार्यालयात सेवादल महानगरकडून सेवा टिफीन योजना राबविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’ने जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर बोलण्यास नकार दिला.

Web Title: Sevadal broke the lock and took possession of the office