तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:17+5:302021-08-26T04:19:17+5:30
जळगाव : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रे तत्काळ सुरू करण्यात यावीत, अशी मागणी जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने निवासी ...

तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करावे
जळगाव : जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रे तत्काळ सुरू करण्यात यावीत, अशी मागणी जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, विविध प्रमाणपत्राचे दाखले, सातबारा हे महा-ई-सेवा केंद्रांमार्फत दिली जातात. मात्र, केंद्र चालक वाजवी दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात. प्रमाणपत्र वितरीत करण्यास अडवणूक करून आर्थिक लुबाडणूक करतात व प्रमाणपत्रही वेळेवर दिले जात नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे. जेणेकरून जनतेची लुबाडणूक न होता शासनाने निश्चित केलेल्या वाजवी दरामध्ये व विहित मुदतीत जनतेला विविध प्रमाणपत्रांचे दाखले मिळतील. त्यामुळे सेतू सविधा केंद्र सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना अमजद पठाण, श्याम तायडे, जगदीश गाढे, मुजीब पटेल, प्रदीप सोनवणे, आदींची उपस्थिती होती.