शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 15:37 IST

मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.

Eknath Khadse ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाणार, हे आता स्पष्ट झालं आहे. स्वत: खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतत असल्याची माहिती दिली आहे. "माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे," असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

भाजप प्रवेशाच्या घडामोडीबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, "माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली  आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.

जयंत पाटलांशी केली चर्चा

"भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत त्यांना या निर्णयामागील कारणे सांगितली. त्यांची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला," असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

दिल्लीत होणार पक्षप्रवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा होती. मात्र खडसे यांना याबाबत खुलासा करत माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात नव्हे तर नवी दिल्ली येथे होईल, असं सांगितलं आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून जेव्हा वेळ दिली जाईल, त्यानंतर मी दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करेन, असं ते म्हणाले.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मी कोणत्याही अटी-शर्थी ठेवल्या नसून आधी माझी जी नाराजी होती, ती दूर झाली असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारJalgaonजळगावmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४