भुसावळात निराधारांची सेवा
By Admin | Updated: June 28, 2017 18:03 IST2017-06-28T18:03:51+5:302017-06-28T18:03:51+5:30
दिगंबर जैन युवा मंच व सूर्य मंडळाचा उपक्रम

भुसावळात निराधारांची सेवा
ऑनलाईन लोकमत
भुसावळ,दि.28- जैन धर्मगुरु आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या 28 रोजी 50 व्या दीक्षा दिवसानिमित्त भुसावळ शहरातील मतीमंद लोकांची सेवा करण्यात आली.
शहरातील अनेक मतीमंद व बेवारस लोकांना अंघोळ घालून त्या सर्व लोकांना नवीन कपडे देण्यात आले. शिवाय त्या सर्वाना पोटभर भोजन देऊन त्यांची सेवा करण्यात आली.
ही मानवसेवा आचार्य श्रीच्या दीक्षा दिनानिमित्त करण्यात आली. हा भावस्पशी कार्यक्रम शहरातील दिगंबर जैन मंदिरात झाला. त्याचे आयोजन दिगंबर जैन युवा मंच व सूर्य मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात आले.