मंगरूळ येथे सेवापूर्ती सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST2021-06-20T04:12:38+5:302021-06-20T04:12:38+5:30

यावेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, गटशिक्षण अधिकारी कविता सुर्वे, शिक्षणविस्तार अधिकारी सी. एम. चौधरी, वैद्यकीय अधिकारी योगेश ...

Service Ceremony at Mangrul | मंगरूळ येथे सेवापूर्ती सोहळा

मंगरूळ येथे सेवापूर्ती सोहळा

यावेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, गटशिक्षण अधिकारी कविता सुर्वे, शिक्षणविस्तार अधिकारी सी. एम. चौधरी, वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, केंद्रप्रमुख भटू पाटील उपस्थित होते.

पारधी व कोरोनाकाळात निवृत्त झालेले वडगाव प्र. ए. चे मुख्याध्यापक मधुकर केदार यांचा मान्यवरांनी सत्कार केला. सत्कारार्थी केंद्रप्रमुख भाईदास पारधी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी लोणी ग्रुप माध्यमिकचे मुख्याध्यापक काटे, धुळपिंप्रीचे शैलेश वाघ, प्राथमिकच्या नीलिमा सोनजे, भाईदास सरदार, कपिल शिरुडकर, प्रवीण कोळी, अनिल पाटील, चंद्रशेखर देसले, पंकजा वाघ, उज्ज्वल परदेशी, रेखा कोठावदे, धरमदास चौधरी, रावसाहेब पाटील, प्रवीण पवार आदी मुख्याध्यापकांसह केंद्रातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्नील सरदार यांनी केले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले.

Web Title: Service Ceremony at Mangrul