शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन!

By अमित महाबळ | Updated: April 13, 2023 15:01 IST

जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी ११,२९० अर्ज आले होते. एका जागेसाठी सरासरी तीन अर्ज होते.

जळगाव : शिक्षक हक्क कायद्यांतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी विनाअनुदानित स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर गुरुवारपासून प्रवेशनिश्चिती सुरू झाली. पण पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन होते.

जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी ११,२९० अर्ज आले होते. एका जागेसाठी सरासरी तीन अर्ज होते. राज्यस्तरीय लॉटरीतून २९८३ बालकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईल क्रमांकावर एसएमएस केले जात आहेत. निवड झालेल्या बालकांची कागदपत्रे गटसाधन केंद्र, पंचायत समिती या ठिकाणी तपासली जाणार आहेत.

प्रवेश निश्चितीसाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत आहे. त्याची सुरुवात गुरुवार (दि.१३) पासून झाली. परंतु, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ स्लो असल्याचा अनुभव पालकांना आला. त्यामुळे त्यांना प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागत होते.

रिसीट आठवणीने घ्या..प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करायचा आहे. प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सोबत राहू द्या..निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति आणि साक्षांकित प्रति त्यांनी सोबत ठेवाव्यात. अलॉटमेंट लेटरची प्रिंट पालकांनी आपल्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील सोबत ठेवावी.

वेटिंगवरील विद्यार्थ्यांनाही संधीनिवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जाणार आहेत. राज्यात ९४,७०० विद्यार्थ्यांची निवड यादी आहे, तर प्रतीक्षा यादीत ८११२९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव