तापी पुलावर जीवघेण्या खड्ड्यांची मालिका : अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:06+5:302021-09-24T04:18:06+5:30
नांदेड, ता. धरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४ वरील सावखेडा -निमगव्हाण गावाजवळील तापी नदीच्या पुलावरील संपूर्ण रस्त्यावर ...

तापी पुलावर जीवघेण्या खड्ड्यांची मालिका : अपघाताची भीती
नांदेड, ता. धरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १४ वरील सावखेडा -निमगव्हाण गावाजवळील तापी नदीच्या पुलावरील संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी असंख्य लहान-मोठे खड्डे पडल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात संभाव्य अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
धरणगाव, अमळनेरकडून चोपड्याकडे जाणारा हा मार्ग रात्रंदिवस अतिशय रहदारीचा आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्तीसह पुलावरील रस्त्याचेही डांबरीकारणाचे काम करण्यात आले होते. पण सद्य:स्थितीत संपूर्ण पुलावरील रस्त्यावर दोन्ही बाजूंना असंख्य लहान-मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पुलापासून सावखेडा बसस्थानकापर्यंतच्या रस्त्यावरदेखील ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांमधून केली जात आहे.
230921\20210923_075505.jpg
सावखेडा -निमगव्हाण जवळील तापीपुलावर असे खड्डे पडले आहेत -छाया -राजेंद्र रडे