जळगाव : प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रदिन गुरूवारी कॅमेरा पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांची उपस्थिती होती. मनपा परिसरात छायाचित्रकार बांधवांसाठी, प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यासह उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी फाऊंडेशनला ११ हजारांची देणगी यावेळी जाहीर केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी महेश देशमुख, पोलीस निरीक्षक के. के. पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अशोक भाटिया व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या वर्षभरात कोरोनासह इतर व्याधींमुळे निधन झालेल्या छायाचित्रकार बांधवांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अय्याज मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वीतेसाठी प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव अभिजित पाटील, सहसचिव संधीपाल वानखेडे, माजी अध्यक्ष सुमित देशमुख, पांडुरंग महाले, जुगल पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, अरुण इंगळे, यांनी प्रयत्न केले.