शिवाजीराव पाटील यांच्या निधनामुळे सहकार चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:30 IST2017-07-22T17:30:48+5:302017-07-22T17:30:48+5:30
माजी मंत्री शिवाजीराव गिरिधर पाटील यांच्या निधनाने सहकार चळवळीचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवाजीराव पाटील यांच्या निधनामुळे सहकार चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला : मुख्यमंत्री
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 22 : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि माजी मंत्री शिवाजीराव गिरिधर पाटील यांच्या निधनाने सहकार चळवळीचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, शिवाजीराव पाटील यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात महत्त्वपूर्ण योगदान होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रात भरीव कार्य केले. विशेषत: सहकार चळवळीच्या विकासासाठी त्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वाची राहिली आहे. सहकारी साखर कारखानदारीच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अथक प्रय} केले. यासंदर्भात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही विविध प्रतिष्ठेच्या संस्थांमध्ये त्यांना जबाबदारीची पदे भूषविण्याची संधी मिळाली. राज्य मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले होते. त्यांच्या निधनाने या क्षेत्राचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे.