स्वातंत्र्य दिनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:23+5:302021-08-17T04:23:23+5:30

पिंपळगाव शिंदाड जि. प. गटाचे सदस्य मधुकर काटे, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, संदीप सराफ यासह सदस्यांनी ...

Senior citizens felicitated on Independence Day | स्वातंत्र्य दिनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

स्वातंत्र्य दिनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

पिंपळगाव शिंदाड जि. प. गटाचे सदस्य मधुकर काटे, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील, संदीप सराफ यासह सदस्यांनी सत्कार केला. सुरुवातीला ग्रामपंचायत आवारात सरपंच ज्ञानेश्वर तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात शाहीर मार्तंड जवरे यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर ७५ वर्षांवरील १२६ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी जि.प. मधुकर काटे, नरेंद्र पाटील, सतीश पाटील, प्रतिभा चौधरी, सदाशिव पाटील, रामभाऊ कुंभार, प्रदीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी डिगंबर पाटील, ग्रा.पं. सदस्य संदीप सराफ, विलास पाटील, स्वप्निल पाटील, अकिल तडवी, समाधान पाटील, उज्ज्वला पाटील, कांताबाई पाटील, ठगूबाई धनगर, जनाबाई पाटील, मीराबाई परदेशी, नजमाबाई तडवी, कांचन परदेशी, धनराज पाटील, इंदल परदेशी, बापू मुट्ठे, राजेंद्र परदेशी, विनोद तडवी, तलाठी गणेश मगावकर, बालू श्रावणे, पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील, दत्तू पाटील, कृष्णा धनगर, दशरथ पाटील, शांताराम बोरसे, प्रदीप धनगर, नारायण पाटील, कर्मचारी संजय पाटील, प्रल्हाद शिंपी, रवींद्र पाटील, अमोल व्यवहारे, संदीप बोरसे, उपस्थित होते. सूत्रसंचालन बालू श्रावणे, प्रास्ताविक नरेंद्र पाटील यांनी तर आभार संदीप सराफ यांनी मानले.

Web Title: Senior citizens felicitated on Independence Day