शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शेंदुर्णी, धुळ्यातून ठरणार राजकीय दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 12:25 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम पाच राज्यांमधील निवडणुकांसोबतच शेंदुर्णी आणि धुळ्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये होत आहे. या निकालातून राजकीय दिशा आणि हवा निश्चित होणार असल्याने या निवडणुकांना महत्त्व आहे.

मिलिंद कुलकर्णीभाजपा आणि कॉंग्रेस-राष्टÑवादी आघाडीने या निवडणुकीत निश्चित रणनीती आखली आहे. या रणनीतीच्या यशापयशावर २०१९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. काँग्रेस आघाडी दोन्ही ठिकाणी भक्कमपणे उतरली आहे. आघाडीला यश मिळाल्यास जागावाटपाविषयी समझोता होऊन आघाडी भाजपाला टक्कर देऊ शकते. जामनेर, जळगावच्या यशाची पुनरावृत्ती झाल्यास भाजपामध्ये गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जाईल.२०१४ मध्ये एकनाथराव खडसे यांनी खान्देशातील भाजपाचे तिकीट वाटप केले होते. डॉ.सुभाष भामरे, डॉ.हिना गावीत, अनिल गोटे यांना भाजपामध्ये आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने खडसे यांना दूर ठेवले. गोटे आणि त्यांचे असलेले ‘गुरुबंधू’चे नाते बहुदा आडवे आले असावे. त्याविषयी खडसेंनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. गोटे तर आता भाजपापासून दूर झालेच आहेत, पण खडसे समर्थक म्हटले जाणारे उदेसिंग पाडवी, संजय सावकारे काय भूमिका घेतात, हे बघायचे.पाच राज्यातील मतदानोत्तर ‘एक्झिट पोल’ हे भाजपाच्यादृष्टीने आनंददायी नाहीत. ‘एक्झिट पोल’च्या विश्वासार्हतेविषयी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांच्या मनात शंका असल्याने मंगळवारी खरे चित्र समोर येईल. पण त्यापूर्वीच शेंदुर्णी नगरपंचायत आणि धुळे महापालिका निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर होतील. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि खान्देशातील या दोन निवडणुकांमध्ये साम्य असे आहे की, या निवडणुकांकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले. भाजपाविरोधात एकत्र आल्याचा काय परिणाम होतो, तेही या निवडणुकांमध्ये दिसून येणार आहे.खान्देशचा विचार केला तर काँग्रेस आघाडी बऱ्याच कालावधीनंतर एकसंघपणे निवडणुकांना सामोरे गेले. कारण नुकत्याच झालेल्या मुक्ताईनगर व जामनेर पालिकांच्या निवडणुकीत आघाडीत कुरबुरी राहिल्या. नंदुरबार पालिका निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेचे सहाय्य घेतले तर मुक्ताईनगरात राष्टÑवादीने शिवसेनेला सहकार्य केले. त्याचा फायदा भाजपाला झाला. परंतु, लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा दबाव आणि देश व राज्य पातळीवर दोन्ही कॉंग्रेसचे नेते एकत्र आले असल्याने स्थानिक नेत्यांना एकत्र येण्यास बाध्य व्हावे लागले.धुळ्यात लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री रोहिदास पाटील हे आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनीही दाजींच्या नावाला संमती दिली असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचे संयुक्त पॅनल विजयी झाले. त्यामुळे रोहिदास पाटील, अमरीशभाई पटेल, राजवर्धन कदमबांडे, डी.एस.अहिरे, दहिते, श्याम सनेर, युवराज करनकाळ या नेत्यांनी एकत्रित येत धुळे महापालिकेची निवडणूक लढवली. रणनीती आखली. सलग १० वर्षे सत्ता असलेल्या राष्टÑवादी काँग्रेसला ‘अँटीइनकम्बन्सी फॅक्टर’ आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांनी भाजपामध्ये केलेला प्रवेश या दोन्ही बाबींवर मात करीत भाजपापुढे मोठे आव्हान उभे करण्यात यश आले.लोकसभा निवडणुकीत रोहिदास पाटील आणि भाजपाचे डॉ.सुभाष भामरे असा सामना रंगू शकतो, त्याची रंगीत तालीम या निवडणुकीत झाली. दाजी आणि बाबा, हे दोन्ही नेते या निवडणुकीत सक्रीय होते. सभा घेतल्या, प्रचार रॅलीत सहभागी झाले. डॉ.भामरे यांनी तर गोटेंच्या आरोपाला प्रथम जोरकसपणे प्रत्युत्तर दिले.कदमबांडे आणि गोटे यांच्या युतीची चर्चा आणि शिवसेनेने गोटेंच्या १३ उमेदवारांना पाठिंबा देऊन केलेली परतफेड हे धुळ्यातील नव्या समीकरणाच्या नांदी ठरणाºया घटना आहेत. रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांच्याविषयी गोटे यांचा असलेला ‘सॉफ्ट कॉर्नर’ लक्षणीय ठरला. शेंदुर्णीत संजय गरुड यांच्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आले.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील ही मोठी नगरपंचायत आहे. पूर्वी ग्रामपंचायत असताना गरुड यांच्या गटातील मतभेदाचा फायदा भाजपाने घेतला आणि सत्ता हस्तगत केली होती. पण यंदा गरुड यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महाजन यांच्यादृष्टीने ही निवडणूक तेवढीच महत्त्वाची आहे. या निवडणुकीमुळे दोन्ही कॉंग्रेसचे नेते एकत्र आले. एका व्यासपीठावर येऊन एकसंघतेची शपथ घेत आहे. पण या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे जागावाटप कसे केले जाते, यावर सगळे भवितव्य अवलंबून राहणार आहे.भाजपाच्यादृष्टीने ही निवडणूक आव्हानात्मक ठरली. पाच राज्यात जसे भाजपाला विरोधासाठी सगळे पक्ष एकत्र आले, तसेच धुळे आणि शेंदुर्णी या दोन्ही ठिकाणी झाले. विरोधकांचे एकवेळ ठीक आहे, पण भाजपाला अंतर्गत विरोधाचाही सामना करावा लागला. धुळ्यात आमदार अनिल गोटे यांनी उघडपणे बंड पुकारले. या दोन्ही ठिकाणी जर भाजपाला यश मिळाले नाही, तर महाजन यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहील. एकनाथराव खडसे यांच्यासह नाराज गट उघडपणे समोर येईल.त्यामुळे निवडणूक जरी दोन ठिकाणची असली तरी त्याचा परिणाम व्यापक असणार आहे.दैवी शक्ती, आरती...शिवसेनेच्या मुखपत्रात आख्खा अग्रलेख लिहिला जातो, यावरुन गिरीश महाजन किती ‘पॉवरफूल’ झाले आहेत, हे सिध्द होते. अर्थात २५ वर्षांची तपश्चर्या त्यामागे आहे. मुख्यमंत्र्यांचा विश्वास जिंकलेला असला तरी ‘संकटमोचक’ म्हणून भूमिका निभावताना कौशल्य कमावले आहे, हे नाकारुन चालणार नाही. धुळ्यात गोटेंनी शिंगावर घेतले असल्याने महाजन आणखी मोठे झाले.जामनेरनंतर शेंदुर्णीत खरी कसोटी आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव