Seminar on Pharmacy at Erandol | एरंडोल येथे फार्मसीवर चर्चासत्र

एरंडोल येथे फार्मसीवर चर्चासत्र

ठळक मुद्दे‘युनिक-वे-आॅफ लर्निंग फार्मसी’ या विषयावर चर्चासत्रशिक्षण घेताना येणारे मानसिक दडपण दूर करून सकारात्मक विचार करावा

एरंडोल, जि.जळगाव : येथे शास्त्री इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसी महाविद्यालयात ‘युनिक-वे-आॅफ लर्निंग फार्मसी’ या विषयावर सोमवारी चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.विजय शास्त्री होते.
जळगावच्या प्रा.डॉ.चैताली पवार यांनी औषधनिर्माण शास्त्र शिकत असताना येणाऱ्या विविध विषयांतील अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मानस संतुलन संस्थेचे मानसोपचारतज्ज्ञ प्रा.दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणारे मानसिक दडपण दूर करून सकारात्मक विचार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
औरंगाबादचे देवेंद्र दंडगव्हाळ प्रमुख अतिथी होते. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव रूपा शास्त्री यांनी केले. सूत्रसंचालन सूरज पाटील यांनी केले. रूतुजा पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य गोपीचंद भोई, प्रा.जावेद शेख, प्रा.कापडणे, प्रा.किरण पाटील, प्रा.हर्षदा पाटील, शेखर बुंदेले व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Seminar on Pharmacy at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.