इयत्ता नववीसाठीची निवड चाचणी परीक्षा आता २४ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST2021-01-14T04:13:58+5:302021-01-14T04:13:58+5:30
जळगाव : साकेगाव येथील केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीच्या सन २०२१ - २२ प्रवेशासाठीची निवड चाचणी ...

इयत्ता नववीसाठीची निवड चाचणी परीक्षा आता २४ फेब्रुवारीला
जळगाव : साकेगाव येथील केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीच्या सन २०२१ - २२ प्रवेशासाठीची निवड चाचणी १३ फेब्रुवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता ही निवड चाचणी परीक्षा २४ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.
दरवर्षी इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालयाकडून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जातात. त्यानंतर निवड चाचणी परीक्षा घेऊन परीक्षा उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्या जागांवर प्रवेश दिला जातो. यंदाही विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार इयत्ता नववीच्या सन २०२१ - २२ प्रवेशासाठीची परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी केले आहे.