टेहू येथील विद्यार्थ्यांची स्पेलबी परीक्षेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 17:52 IST2019-07-28T17:51:25+5:302019-07-28T17:52:52+5:30

पारोळा : तालुक्यातील टेहू येथील राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पेलबी स्पर्धा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण ...

Selection for Spellby Exam for Students at Tehu | टेहू येथील विद्यार्थ्यांची स्पेलबी परीक्षेसाठी निवड

टेहू येथील विद्यार्थ्यांची स्पेलबी परीक्षेसाठी निवड



पारोळा : तालुक्यातील टेहू येथील राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पेलबी स्पर्धा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांची राज्यस्तरीय परीक्षेसाठी निवड करण्यात आली. येथील १३ विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पेलबी स्पर्धा परीक्षेत सहभागी झाले होते. त्यापैकी दुर्गेश परेश सूर्यवंशी (इयत्ता दुसरी), लोकेश भाऊसाहेब पाटील (दुसरी), पार्थ प्रमोद बिश्वास (चौथी), रुपेश किशोर पाटील (पाचवी), कौशल महेंद्र पाटील (सहावी), संकेत सतीश पाटील (आठवी) या सहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्यांचे प्रशासकीय अधिकारी रोहन मोरे, मुख्याध्यापक दीपक ऐलीस आदींंनी कौतुक केले.

Web Title: Selection for Spellby Exam for Students at Tehu