ब्लॉक पदाधिकाºयांची निवड आठवडाभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:07 IST2017-09-30T00:05:36+5:302017-09-30T00:07:57+5:30
काँग्रेस निवडणूक : सर्व ठिकाणचे अहवाल रवाना

ब्लॉक पदाधिकाºयांची निवड आठवडाभरात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा काँग्रेस कमेटीच्या ब्लॉक पदाधिकाºयांची निवड जवळपास ८ दिवसात जाहीर होईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
काँग्रेसची ब्लॉक पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया गुुरुवारी पूर्ण झाली. जिल्ह्यातील ग्रामीणच्या एकूण २१ ब्लॉकच्या पदाधिकारी निवडीबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद तंवर ( दिल्ली) यांनी काँग्रेस भवनात गुरुवारी दिवसभर ब्लॉक निवडणूक अधिकाºयांकडून ब्लॉक निहाय निवडणूक कार्यक्रमाचा अहवाल घेतला व तो वरिष्ठांना सादर करण्यासाठी रात्री ते येथूून रवाना झाले आहेत.
यावेळी बोदवडचे बीआरओ राजेंद्र देसले यांच्याशी बोदवडच्या पदाधिकारी निवडीबाबत वरिष्ठांचे मतभेद झाले होते.
यावरही तोडगा जवळपास निघाला असल्याची माहितीही अॅड.संदीप पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
अशी असते ब्लॉक कमेटी
ब्लॉक अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, ६ जिल्हा प्रतिनिधी, १ प्रदेश प्रतिनिधी. ब्लॉक कमेटी पदाधिकारी निवड जाहीर झाल्यावर जिल्हा कमेटीची निवड केली जाईल.