अनिल लोंढे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:57+5:302021-09-04T04:21:57+5:30
मधुकर धनगर यांची निवड जळगाव : धनगर समाज महासंघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी मधुकर धनगर यांची निवड करण्यात आली आहे. ...

अनिल लोंढे यांची निवड
मधुकर धनगर यांची निवड
जळगाव : धनगर समाज महासंघाच्या जळगाव तालुकाध्यक्षपदी मधुकर धनगर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष ॲड. चिमण डांगे व महासंघ प्रदेश बबनराव संनगे यांनी ही निवड केली आहे. (०४सीटीआर ३९)
सीए शाखेतर्फे चर्चासत्र उत्साहात
जळगाव : जळगाव सीए शाखेतर्फे ‘एमएसई ॲण्ड स्टार्ट अप’ या विषयावर नुकतेच चर्चासत्र झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजर रश्मी रेखा, जिंदाचे सचिव सचिन चोरडिया, अध्यक्ष प्रशांत अग्रवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ममता राजानी यांनी तर आभार विकी बिर्ला यांनी मानले.
विद्यार्थ्यांनी साकारला ‘शब्द नजर’ प्रकल्प
जळगाव : विद्या इंग्लिश स्कूलच्या मराठी विषयात शिकणाऱ्या इयत्ता ३ री ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘शब्द नजर’ हा प्रकल्प शब्दसंपत्ती लिहून आकर्षक पद्धतीने साकारला. त्यांनी शब्दांच्या विकारी व अविकारी जाती व्याख्या व उदाहरणासहित सादर केल्या. या विद्यार्थांचे मुख्याध्यापक हॅरी जॉन व प्रशासिका कामिनी भट यांनी कौतुक केले. त्यांना शिक्षिका आरती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
इनरव्हील क्लबतर्फे दिव्यांग गायिकांना साड्या वाटप
जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे दिव्यांग गायिकांचा नुकताच देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने गाणे सादर केल्याबद्दल त्यांना मानधन, साडी व इतर भेटवस्तू देण्यात आल्या. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक चंद्रकांत सिन्हा, उद्योजक सुरेंद्र पाल सिंग, उद्योजक राजन पिल्लई, इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी फिरोज काझी, अध्यक्षा प्राजक्ता वैद्य, अबेदा काझी, नूतन कक्कड, संध्या महाजन उपस्थित होते.(०४ सीटीआर ४१)