कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त

By Admin | Updated: October 7, 2015 00:18 IST2015-10-07T00:18:22+5:302015-10-07T00:18:22+5:30

धुळे : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची मंगळवारी दुपारी जप्त करण्यात आली़

The seizure of the Executive Engineer seized | कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त

कार्यकारी अभियंत्याची खुर्ची जप्त

धुळे : साक्री तालुक्यातील आयने येथील शेतक:याला वाढीव मोबदला वेळेत मिळाला नाही़ त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्याची खुर्ची मंगळवारी दुपारी जप्त करण्यात आली़

साक्री तालुक्यातील आयने येथील भगवान डोंगर राजपूत यांच्या शेतात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून पाझर तलाव बांधण्यात आला़ शासकीय तलाव असल्याने शेतकरी भगवान राजपूत यांना 1996 मध्ये 39 हजार 213 रुपये देण्यात आल़े मात्र ही रक्कम कमी असल्याने त्याच्या विरोधात शासनदरबारी त्यांनी पाठपुरावा केला़ पण त्यांना न्याय मिळत नव्हता़ शेवटी त्यांनी हे प्रकरण वाढीव मोबदला मिळावा यासाठी न्यायालयात सादर केल़े त्यावर निकाल लागला़ दोन महिन्यांपूर्वी खुर्ची जप्तीची कारवाई होणार होती़ मात्र ती मंगळवारी झाली़ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीसाठी पाठपुरावा केला असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस़ एस़ पाटील यांनी सांगितल़े

Web Title: The seizure of the Executive Engineer seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.