भुसावळात घातक शस्त्रसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:17 IST2021-08-01T04:17:31+5:302021-08-01T04:17:31+5:30

भुसावळ : भुसावळात घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. खंडणीखोर महिला आणि मोबाईल हिसकावणाऱ्या ...

Seizure of deadly weapons in Bhusawal | भुसावळात घातक शस्त्रसाठा जप्त

भुसावळात घातक शस्त्रसाठा जप्त

भुसावळ : भुसावळात घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. खंडणीखोर महिला आणि मोबाईल हिसकावणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरात बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात चार चाकू, चार तलवारी, एक रायफल, दोन बंदूक असा शस्त्रसाठा जप्त केला. यातील दोन आरोपी फरार झाले आहेत.

दुसऱ्या घटनेत मोबाईल चोरणाऱ्या सागर राकेश आढाळे (१९) व भूषण समाधान सपकाळे (१९ दोन्ही रा.आंबेडकर नगर, भुसावळ) या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच अश्लील क्लिप पाठवून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या लीना तल्हारे हिला अटक करण्यात आली आहे तर अजय गोडाले, शुभम पचरवाल व तीन अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Seizure of deadly weapons in Bhusawal