21 हजारांच्या विदेशीसह बिअर जप्त

By Admin | Updated: April 15, 2017 00:32 IST2017-04-15T00:32:11+5:302017-04-15T00:32:11+5:30

सहायक अधीक्षकांची कारवाई : न्यू पोर्टर चाळमधील महिला पसार

Seized beer with 21 thousand foreigners | 21 हजारांच्या विदेशीसह बिअर जप्त

21 हजारांच्या विदेशीसह बिअर जप्त

भुसावळ : शहरातील न्यू पोर्टर चाळ भागात बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह पथकाने टाकलेल्या धाडीत 21 हजारांच्या विदेशी दारूसह बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या़ 
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपी बानोबी मो़ सलीम ही महिला पसार झाली़ 15 दिवसांपूर्वीही महिलेविरुद्ध अवैधरीत्या दारू विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, हे विशेष ! सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार न्यू पोर्टर चाळ भागातील एका घराची झडती घेतल्यानंतर त्यातून 231 बिअरच्या बाटल्यांसह विदेशी दारू मिळून 21 हजार 92 रुपयांची दारू जप्त करण्यात आली़ उपनिरीक्षक युवराज अहिरे, एएसआय दिलीप कोळी, हवालदार प्रदीप पाटील, संदीप चव्हाण, श्रीकांत ठाकूर, शालिनी वाळके, विजया घेटे, सुनील शिंदे, राजेश काळे, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, सैयद असमद आदींनी ही कारवाई केली़

Web Title: Seized beer with 21 thousand foreigners