महिलेला पाहून त्याने केले हस्तमैथून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST2020-12-08T04:14:13+5:302020-12-08T04:14:13+5:30

जळगाव : घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असलेल्या महिलेच्या समोर सागर बांगर या तरुणाने हस्तमैथून केल्याची घटना सोमवारी सकाळी ...

Seeing the woman, he masturbated | महिलेला पाहून त्याने केले हस्तमैथून

महिलेला पाहून त्याने केले हस्तमैथून

जळगाव : घराच्या गच्चीवर कपडे वाळत टाकत असलेल्या महिलेच्या समोर सागर बांगर या तरुणाने हस्तमैथून केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता सावखेडा रस्त्यावरील एका नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावखेडा शिवारातील एका नगरात वास्तव्याला असलेली २२ वर्षीय महिला सोमवारी सकाळी तिच्या लहान मुलासह घराच्या गच्चीवर धुतलेले कपडे वाळत टाकत होती. त्याचवेळी तिच्या घरासमोर राहणारा सागर बांगर हा त्याच्या गॅलरीत हस्तमैथून करीत होता. हा प्रकार पाहून महिला भेदरली. तिने ड्युटीवर गेलेल्या पतीला तातडीने घरी बोलावून घेतले. दुपारी त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सागर बांगरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने घडला प्रकार मान्य केला, मात्र त्यावेळी या महिलेकडे माझे लक्ष नव्हते, असे सांगितले. महिलेने देखील सागरच्या आपल्याकडे लक्ष नसल्याचे मान्य केले, परंतु, दिवसाढवळ्या घराच्या बाहेर असा प्रकार करणे चुकीचे असल्याने त्याला शिक्षा व्हावी म्हणून तक्रार दिल्याचे या पती-पत्नीचे म्हणणे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Seeing the woman, he masturbated