शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

पाडळसरेत तापीमाईला साडी-चोळी अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:06 IST

कळमसरे, ता.अमळनेर : हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पाडळसरे धरणस्थळी तापी नदी दुथडी वाहत आहे. यानिमित्त माजी आमदार कृषिभूषण साहेबराव ...

कळमसरे, ता.अमळनेर : हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पाडळसरे धरणस्थळी तापी नदी दुथडी वाहत आहे. यानिमित्त माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी येथे तापीमायीची ओटी भरून विधीवत जलपूजन केले.या प्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, देखरेख संघाचे माजी चेअरमन विक्रांत पाटील, शेतकरी संघाचे जितेंद्र राजपूत, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, वसंतराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, पाडळसरेचे माजी सरपंच रवींद्र पाटील, रमेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आयटी सेलचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील, नगरसेवक मनोज पाटील, संजय पाटील, नितीन पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जलपूजन करून ओटी भरली.महाराष्ट्र शासनाने पाडळसरे धरणासाठी आवश्यक निधी येत्या पाच वर्षात उपलब्ध करूनदेखील अमळनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभाराने पाडळसरे धरणाचे पाणी अडविण्याचे काम झाले नाही. दरवर्षी अर्थसंकल्पात तरतुदीनुसार निधी मिळूनदेखील २०१४ नंतर धरणाचे काम थंडावल्याची खंत मा.आ. साहेबराव पाटील यांनी जलपूजनप्रसंगी व्यक्त केली. आवश्यक निधी उपलब्ध असतानाही मुख्य धरणाचे काम करण्यात आले नाही. २०१४ पर्यंत झालेल्या कामामुळे २ टीएमसी पाणीसाठा होऊन १७ किमीपर्यंत जलफुगवटा निर्माण झाला होता. त्यामुळे येथून शेतीसाठी तसेच अमळनेर शहरास पाणीपुरवठा कलाली डोहातून करण्यात येत होता. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत एक थेंबही पाणी अडविण्यासाठी काम करण्यात आले नाही. त्यामुळे राज्यपालांच्या निदेर्शांचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप मा.आ.पाटील यांनी केला.