पाडळसरेत तापीमाईला साडी-चोळी अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:06 IST2019-07-06T21:06:13+5:302019-07-06T21:06:18+5:30
कळमसरे, ता.अमळनेर : हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पाडळसरे धरणस्थळी तापी नदी दुथडी वाहत आहे. यानिमित्त माजी आमदार कृषिभूषण साहेबराव ...

पाडळसरेत तापीमाईला साडी-चोळी अर्पण
कळमसरे, ता.अमळनेर : हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्याने पाडळसरे धरणस्थळी तापी नदी दुथडी वाहत आहे. यानिमित्त माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी येथे तापीमायीची ओटी भरून विधीवत जलपूजन केले.
या प्रसंगी माजी आमदार साहेबराव पाटील, देखरेख संघाचे माजी चेअरमन विक्रांत पाटील, शेतकरी संघाचे जितेंद्र राजपूत, पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, वसंतराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, पाडळसरेचे माजी सरपंच रवींद्र पाटील, रमेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आयटी सेलचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील, नगरसेवक मनोज पाटील, संजय पाटील, नितीन पाटील यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जलपूजन करून ओटी भरली.
महाराष्ट्र शासनाने पाडळसरे धरणासाठी आवश्यक निधी येत्या पाच वर्षात उपलब्ध करूनदेखील अमळनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभाराने पाडळसरे धरणाचे पाणी अडविण्याचे काम झाले नाही. दरवर्षी अर्थसंकल्पात तरतुदीनुसार निधी मिळूनदेखील २०१४ नंतर धरणाचे काम थंडावल्याची खंत मा.आ. साहेबराव पाटील यांनी जलपूजनप्रसंगी व्यक्त केली. आवश्यक निधी उपलब्ध असतानाही मुख्य धरणाचे काम करण्यात आले नाही. २०१४ पर्यंत झालेल्या कामामुळे २ टीएमसी पाणीसाठा होऊन १७ किमीपर्यंत जलफुगवटा निर्माण झाला होता. त्यामुळे येथून शेतीसाठी तसेच अमळनेर शहरास पाणीपुरवठा कलाली डोहातून करण्यात येत होता. मात्र, त्यानंतरच्या पाच वर्षांत एक थेंबही पाणी अडविण्यासाठी काम करण्यात आले नाही. त्यामुळे राज्यपालांच्या निदेर्शांचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप मा.आ.पाटील यांनी केला.