यावल शहरातील दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:20+5:302021-07-11T04:12:20+5:30
रावेर : यावल शहरातील सराफा दुकानावर भरदिवसा पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे, धोक्याची सायरन बसवून रात्री ...

यावल शहरातील दरोड्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बैठक
रावेर : यावल शहरातील सराफा दुकानावर भरदिवसा पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराफा बाजारात सीसीटीव्ही कॅमेरे, धोक्याची सायरन बसवून रात्री व दिवसा सुरक्षारक्षक नेमण्याबाबत फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीत सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, फौजदार अनिस शेख, फौजदार मनोज वाघमारे, फौजदार मनोहर जाधव, सराफा बाजारातील व्यावसायिक तथा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय गोटीवाले, शशांक बोरकर, संजय बोरकर, अनिश अग्रवाल, राजेश अग्रवाल, विक्रम बोरकर, मनोज विचुरकर आदी सराफा दुकानदार हजर होते.
बकरी ईदची नमाज घरीच अदा करा : नरेंद्र पिंगळे
कोरोनाच्या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करतांना कुणीही मशिद, इदगाह मैदान वा सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण न करता सोशल डिस्टंन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आपापल्या घरीच नमाज अदा करावी. कुर्बानी ही प्रतीकात्मक स्वरूपात द्यावी अशी सूचना फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मुस्लीम पंच कमिटीचे कार्यकर्ते व मशिदीचे पेशईमाम यांना केली.