दुसरी लाट ओसरतेय... मात्र नॉन कोविड यंत्रणा सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:23+5:302021-07-11T04:12:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डमी 900 जळगाव : जिल्हाभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा गेल्या महिन्या ...

The second wave is waning ... but waiting for the non-covid system to start | दुसरी लाट ओसरतेय... मात्र नॉन कोविड यंत्रणा सुरू होण्याची प्रतीक्षा

दुसरी लाट ओसरतेय... मात्र नॉन कोविड यंत्रणा सुरू होण्याची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

डमी 900

जळगाव : जिल्हाभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा गेल्या महिन्या दीड महिन्यांपासून एक टक्क्यांच्या खालीच असल्याने आतातरी नॉन कोविड उपचारांची यंत्रणा पूर्ववत सुरू व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. अनेकांच्या नियोजित शस्त्रक्रिया या थांबलेल्या असून, त्या व्हाव्यात, शिवाय दिव्यांग बोर्डही सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ दोन महिन्यांच्या कालावधीकरिताच नॉन कोविड सेवा सुरू झाली होती. फेब्रुवारीपासून पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने मार्च महिन्यात पुन्हा पूर्ण रुग्णालय हे कोविड करण्यात आले. यात मार्च, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण होते. सर्व कक्ष अगदी फुल्ल होते. अनेक रुग्णांना वेटिंग रहावे लागत होते, अशी गंभीर परिस्थिती दुसऱ्या लाटेत समोर आली होती. मात्र, आता दुसरी लाट ओसरू लागली आहे. दिवसाला आता एक किंवा दोन रुग्णच दाखल होण्यासाठी रुग्णालयात येत आहे.

कोणत्या शस्त्रक्रिया रखडल्या

१ कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया या दीड वर्षाच्या काळात केवळ काही प्रमाणातच झालेल्या आहेत.

२ पोटाच्या विकाराच्या शस्त्रक्रिया यात हर्निया, अपेंडिक्स,

३ कर्करोगाच्या शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया

४ थायरॉइड, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया या नियोजित शस्त्रक्रिया या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण : कोविड २४, म्युकर १६, अन्य १२

शासकीय रुग्णालयात सद्या रिकामे असलेले बेड : ३३४

आपात्कालीन उपचार सुरूच

- पहिल्या लाटेत पूर्णत: कोविड रुग्णालय करण्यात आल्यानंतर आपत्कालीन उपचारांसाठी जीएमसीत व्यवस्था करण्यात आली नव्हती, त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते.

- दुसऱ्या लाटेत मात्र, याची दक्षता घेत नेत्र कक्षात पूर्णवेळ आपत्कालीन उपचारांची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या आपत्कालीन गंभीर रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांनानंतर डॉ. उल्हास रुग्णालयात पाठविले जाते.

- विशेष बाब म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थितीतील रुग्णांना याठिकाणी दाखलही करून घेतले जात आहे. गरिबांना कोरानाशिवाय इतर उपचार झाले कुठे?

- आपत्कालीन प्राथमिक उपचारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली होती.

- याव्यतिरिक्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात गरिबांवर उपचार झाले आहेत.

- गेल्या वर्षी आयुर्वेद महाविद्यालयात नॉन कोविड उपचारांची व्यवस्था करण्यात आलेली होती.

कोट

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र, तिसऱ्या लाटेचाही अंदाज आहेच. त्यामुळे पुढील सर्व परिस्थिती बघून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोविड यंत्रणा सुरू करण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी निर्णय घेतील. ग्रामीण भागातील यंत्रणेत काही प्रमाणात नॉन कोविड सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

दिव्यांग बोर्ड सुरू होणार

दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी असलेले दिव्यांग बोर्डही गेल्या दीड वर्षाच्या काळात केवळ दोन महिनेच सुरू राहिले होते. त्यामुळे दिव्यांग बांधवांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे बोर्ड चालू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती असून, त्याची चाचपणी केली जात आहे. यानंतर हे बोर्ड सुरू होणार असल्याचे समजते.

- पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या दरम्यान यंत्रणेला अगदी कमी वेळ मिळाला होता. रुग्णसंख्या अगदी झपाट्याने वाढली होती. त्यामुळे आता नॉन कोविड करण्याचा निर्णय अगदी तातडीने न घेता तो सावकाश घेतला जाईल, असे एकंदरीत चित्र आहे. मात्र, मोहाडी रुग्णालयात पूर्णत: कोविडचे उपचार करून आता जीएमसीत नॉन कोविड यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: The second wave is waning ... but waiting for the non-covid system to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.