शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दुसरे प्रशिक्षण : मतमोजणीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:45 IST

जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सात व्हीव्हीपट तपासणार

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून बुधवारी जिल्हा प्रशासनातर्फे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. एक प्रकारे मतमोजणी स्थळी ही रंगीत तालीम करण्यात येऊन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसंदर्भात शनिवारी प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर बुधवार, २२ रोजी दुसरे प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाºयांना बसविण्यात येऊन प्रशिक्षण देण्यात आले.या वेळी जळगाव लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अजयकुमार, मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर रावेर मतदार संघाच्या मतमोजणीस्थळी रावेर लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक छोटेलाल प्यासी, निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कर्मचाºयांना सकाळीच समजणार टेबल२२ रोजी ज्या टेबलावर बसवून कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले, ते कर्मचारी त्याच टेबलवर राहणार नसून त्यांना कोठे मतमोजणी करायची आहे, हे २३ रोजी सकाळी त्यांना मतमोजणी स्थळी पोहचल्यानंतरच समजणार आहे.एकाच वेळी सर्वांना ‘सुविधा’वर समजणार माहितीप्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एक फेरी झाल्यानंतर त्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आज्ञावलीत भरण्यात येणार आहे. ही माहिती ‘सुविधा’ पोर्टलवर भरण्यात येणार असल्याने एकाच वेळा सर्वांना ती समजू शकणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.जागेवरच मिळणार नाश्ता, जेवणमतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाºयांना त्यांच्या जागेवरच नाश्ता, जेवण मिळणार असून त्यांना कोठेही हालता येणार नाही. कर्मचाºयांना काहीही अडचण आल्यास ती दूर करण्यासाठी निरीक्षकांचीही निवड करण्यात आलेली आहे.चुका होऊ देऊ नकाया प्रशिक्षणदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी मार्गदर्शन करून प्रकृतीची काळजी घेण्यासह चुका होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या. चुका टाळण्यासाठी उशिरही होता कामा नये, असेही सूचित केले.जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात सात व्हीव्हीपॅटची तपासणीटपाली मतदान, ईव्हीएमवरील मतमोजणीनंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटची सोडतीद्वारे निवड करून त्यातील मतदान स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे व त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. यात बारा विधानसभा क्षेत्रापैकी जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मात्र सात व्हीव्ही पॅटमधील स्लीपची मोजणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी मतदान सुरु करण्यापूर्वी घेण्यात आलेले मॉक पोल उडविले गेले नव्हते. त्यामुळे या ठिकाणी दोन जादा व्हीव्हीपॅटमधील स्लीपची मोजणी करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव