तीस वर्षात दुसऱ्यांदा खंडित झाली पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:04+5:302021-07-21T04:13:04+5:30

कजगाव, ता. भडगाव : सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे राज्यातील सर्वच देवस्थाने बंद ...

For the second time in thirty years, Pandhari Wari was broken | तीस वर्षात दुसऱ्यांदा खंडित झाली पंढरीची वारी

तीस वर्षात दुसऱ्यांदा खंडित झाली पंढरीची वारी

कजगाव, ता. भडगाव : सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे राज्यातील सर्वच देवस्थाने बंद आहेत. त्यामुळे अनेक भाविक मंदिरात जाण्यापासून वंचित आहेत. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथील भगवान विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी लाखो भाविकांना वंचित राहावे लागले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच विठ्ठल भक्तांना घरूनच विठोबाचे दर्शन घ्यावे लागत आहे. यावर्षीदेखील घरूनच दर्शन घ्यावे लागले.

गोंडगाव येथील यशवंत महाराज (कमळगावकर) गेल्या तीस वर्षांपासून दरवर्षी दिंडीतून पायी सहभाग घेतात; मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तीस वर्षात दुसऱ्यांदा त्यांना विठ्ठल भेटीपासून वंचित राहावे लागले आहे. आतापर्यंत तीस वर्षात एकही पायी दिंडी न सोडणाऱ्या यशवंत महाराज यांनी विठ्ठल भेट कडक निर्बंधानंतर पूर्ण करणार असल्याचे संगितले, तसेच जगावर असलेले कोरोनाचे संकट लवकरच जावे, अशी प्रार्थना त्यांनी भगवान विठ्ठलाला केली आहे.

गेल्या तीस वर्षांपासून विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करून जात होतो. तीस वर्षात कधीही वारीत खंड पडला नाही; मात्र गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशीला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाऊ शकलो नाही. त्यामुळे यंदा भगवान विठ्ठलाचे दर्शन घरूनच घेतल्याचे यशवंत महाराज यांनी सांगितले.

200721\20jal_8_20072021_12.jpg

हभप यशवंत महाराज

Web Title: For the second time in thirty years, Pandhari Wari was broken