दुस:या दिवशीही धानोरा येथे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 13:16 IST2017-08-07T13:14:51+5:302017-08-07T13:16:08+5:30

बंद घर केले लक्ष्य : गुन्हा दाखल नाही

On the second day there was a burglar at Dhanora | दुस:या दिवशीही धानोरा येथे घरफोडी

दुस:या दिवशीही धानोरा येथे घरफोडी

ठळक मुद्देरविवारी पहाटे दोन ठिकाणी घरफोडी10 हजाराचा ऐवज लंपासमहामार्गावरील घरात चोरी

ऑनलाईन लोकमत

धानोरा, जि. जळगाव, दि. 7 - : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे रविवारी पहाटे दोन ठिकाणी घरफोडी होण्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही, तोच दुस:या दिवशीही तीन ठिकाणी घरफोडीची घटना घडली. यात एका घरातून 10 हजाराचा ऐवज लंपास केला. दर दोन घरांमध्ये त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. मात्र तीनही ठिकाणी चोरटय़ांनी दगडाच्या साह्यानेच कुलूप तोडले आहे.
रविवारी आस्थानगर व महामार्गावरील एका घरात चोरी करीत चोरटय़ांनी 20 हजाराचा ऐवज लंपास केला होता. 
सोमवारी पहाटे चोरटय़ांनी लक्ष्मीनगरातील गंगाधर भिवसन पाटील यांच्या घराचे कुलूप दगडाने तोडून आत प्रवेश केला. चोरांनी दोन हजार रूपये किंमतीचे लहान मुलांचे कडे, व आठ हजार रूपये रोख असा 10 हजाराचा ऐवज लंपास केला. तेथून चोरटय़ांनी जगन वामन गुजर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. गुजर यांच्या घरात असलेले कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.मात्र चोरांच्या हाती काहीच लागले नाही.  त्यानंतर सुवर्णसागार नगरातील रहिवाशी हरी काशिनाथ चौधरी यांच्या घरात भाडेकरू असलेले शिक्षक सीताराम तडवी हे बाहेरगावी गेले असता, चोरटय़ांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.मात्र चोरांच्या हाती काहीच लागलेले नाही.
धानोरा येथे तीन ठिकाणी घरफोडी झाल्याचे समजताच अडावद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, यांनी भेट देऊन पहाणी केली. कॉन्टेबल संतोष पारधी, रवींद्र साळुंखे, इब्राहिम शहा, यांनी पंचनमा केला. 

Web Title: On the second day there was a burglar at Dhanora