जळगावात सलग दुस:या दिवशी गुरांचा ट्रक पकडला
By Admin | Updated: April 15, 2017 16:29 IST2017-04-15T16:29:55+5:302017-04-15T16:29:55+5:30
शनिवारी सकाळी पुन्हा औरंगाबाद येथेच म्हशी घेऊन जाणारा मेटॅडोअर औद्योगिक वसाहत पोलिसांनी पकडला.

जळगावात सलग दुस:या दिवशी गुरांचा ट्रक पकडला
जळगाव,दि.15- रुग्णवाहिकेतून औरंगाबादकडे वासरे घेऊन जात असतानाच्या घटनेस अवघे काही तास उलटत नाही तोच सलग दुस:या दिवशी शनिवारी सकाळी पुन्हा औरंगाबाद येथेच म्हशी घेऊन जाणारा मेटॅडोअर औद्योगिक वसाहत पोलिसांनी पकडला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी थांबण्याचा इशारा करुनही चालकाने न थांबविता मेटॅडोअर सुसाट वेगाने पुढे नेल्याने पाठलाग करुन चिंचोली गावाजवळ अडविण्यात आला.
सहायक निरीक्षक सचीन बागुल, अविनाश देवरे, परिष जाधव हे शनिवारी सकाळी आठ ते दुपारी 2 या डय़ुटीत होते. आर.एल.चौकाजवळ या पथकाला औरंगाबादकडे जाणारा मेटॅडोअर (एम.एच.04 डी.डी.6231) हात देऊन थांबविण्याचा इशारा केला, मात्र चालकाने तेथे न थांबता गाडी पुढे नेली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मेटॅडोअरचा पाठलाग केला. चार कि.मी.अंतरावर चिंचोली गावाजवळ हे वाहन अडविण्यात आले. चालक अरविंद दत्तू चित्ते (वय 27 रा.एरंडोल) याची चौकशी केली असता त्याच्याकडे गुरे वाहून नेण्याचा परवाना नव्हता. अधिक चौकशी केली असता या म्हशी समदखान मेहमुद खान (रा.एरंडोल) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले.