शिवसेना-भाजपाकडून उमेदवाराचा शोध

By Admin | Updated: June 9, 2014 14:16 IST2014-06-09T14:16:45+5:302014-06-09T14:16:45+5:30

मोदी लाटेचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील किंवा नाही हा चर्चेचा एक विषय असताना शहर विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजप महायुतीला उमेदवारीसाठी नवा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे.

Search for candidate from Shiv Sena-BJP | शिवसेना-भाजपाकडून उमेदवाराचा शोध

शिवसेना-भाजपाकडून उमेदवाराचा शोध

निखिल सूर्यवंशी ■ धुळे

मोदी लाटेचा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकून राहील किंवा नाही हा चर्चेचा एक विषय असताना शहर विधानसभा मतदारसंघात मात्र शिवसेना-भाजप महायुतीला उमेदवारीसाठी नवा चेहरा शोधण्याची वेळ आली आहे. तसेच इच्छुकांची भाऊगर्दी कायम असून अनेक जण तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा पराभव झाल्याने राज्यात मोदी लाट करिष्मा करेल आणि महायुतीची सत्ता येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे शहर मतदारसंघात परिवर्तन घडेल, अशी आस इच्छुक बांधून आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या १९ वर पोहोचली आहे. ते बाशिंग बांधून तयार आहेत. 
प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांमध्ये असेल. आघाडीतर्फे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे उमेदवार, तर महायुती उमेदवाराचा शोध घेत आहे. महायुतीत सेनेच्या हाडाच्या कार्यकर्त्याला व सर्वपरिचित चेहर्‍याला उमेदवारी दिली जावी आणि आघाडीला तोडीस तोड उमेदवार आयात करावा, असे दोन मतप्रवाह आहेत. कदमबांडे यांच्या विरोधात शिवसेनेचे महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे यांनी सुरू केलेली आरोपांची पत्रकबाजी ही त्यांना उमेदवारी हवी असल्याचे मानले जाते. त्यास राष्ट्रवादीने प्रत्युत्तर देणे सुरू केल्याने निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे चित्र आहे. लोकसंग्रामचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्या लोकप्रियतेचा आलेख महापालिका निवडणुकीपासून घसरल्याने ते की, त्यांचा मुलगा तेजस वा पत्नी, माजी नगराध्यक्षा हेमा गोटे उमेदवार असतील याविषयी उत्सुकता आहे. उमेदवार असल्याचे जाहीर करीत डॉ.माधुरी बोरसे, अँड.नितीन चौधरी यांनी आतापासून प्रचार सुरू केला आहे. त्यांच्यासह गोटे, सुभाष देवरे, युवराज करनकाळ महायुतीची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रमुख पक्षातील इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असल्याने कदमबांडे यांनी तर विकासकामांचा धडाका सुरू करून निवडणूक सुरू झाल्याचे चित्र निर्माण केले आहे. 
 
अनिल गोटे लोकसंग्राम५९,५७६
राजवर्धन कदमबांडेराष्ट्रवादी३0,८३५
साबीर शेख बसपा२५,३४0 
लोकसभा निवडणूक मताधिक्य- महायुती १,३0,७२३
 
इच्छुकांचे नाव व पक्ष-
अनिल गोटे, लोकसंग्राम; राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी; सुभाष देवरे, युवराज करनकाळ, काँग्रेस; अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, शिवसेना. आ. अनिल गोटे लोकसंग्राम पक्ष 

Web Title: Search for candidate from Shiv Sena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.