महिनाभरापूर्वीच कट अन् पार्टीत शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST2021-09-24T04:20:49+5:302021-09-24T04:20:49+5:30
आकाशला मारण्यासाठी महिनाभरापूर्वीच कट शिजला होता. बाबू सपकाळे याने विक्की अलोने यास गावठी कट्टा घेण्यासाठी ३० हजार रुपये दिले ...

महिनाभरापूर्वीच कट अन् पार्टीत शिक्कामोर्तब
आकाशला मारण्यासाठी महिनाभरापूर्वीच कट शिजला होता. बाबू सपकाळे याने विक्की अलोने यास गावठी कट्टा घेण्यासाठी ३० हजार रुपये दिले होते. चोपडा तालुक्यापासून जवळ मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावातून त्याने गावठी कट्टा आणि काडतूस खरेदी केला होता. बुधवारी सर्व मित्र एकत्र पार्टीसाठी बसले होते. रात्रभर पार्टी केल्यानंतर राकेशच्या खुनाचा आजच बदला घ्यायचा असे ठरले. गुरुवारी सकाळी सहा वाजता बाबू आणि सोनू यांना घरी सोडून इतर चौघे रिक्षाने निघून गेले. सकाळी ७.४५ च्या सुमारास विक्की अलोने, मिलिंद सकट, सुपड्या आणि बंटी महाले हे चौघे आकाशच्या घरी पोहोचले. विक्की आणि मिलिंद दोन गावठी पिस्तूल घेऊन आकाशच्या घरात शिरले. पलंगावर झोपलेल्या आकाशच्या अंगावरील चादर बाजूला काढत तो आकाशच असल्याची खात्री पटल्यावर दोघांनी गोळीबार केल्याचीही माहिती समोर आली आहे.