चोपडा साखर कारखान्याची बॅंक खाती सील; एफआरपीनुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याचा परिणाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 09:45 PM2022-02-14T21:45:10+5:302022-02-14T21:45:17+5:30

जळगाव : चहार्डी येथील चोपडा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीनुसार प्रति टन ६०० रूपये शेतकऱ्यांना अदा केलेले नाही. यामुळे या ...

Seal the bank accounts of the Chopda Sugar Factory; Consequences of non-payment to farmers as per FRP | चोपडा साखर कारखान्याची बॅंक खाती सील; एफआरपीनुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याचा परिणाम 

चोपडा साखर कारखान्याची बॅंक खाती सील; एफआरपीनुसार शेतकऱ्यांना रक्कम अदा न केल्याचा परिणाम 

googlenewsNext

जळगाव : चहार्डी येथील चोपडा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीनुसार प्रति टन ६०० रूपये शेतकऱ्यांना अदा केलेले नाही. यामुळे या कारखान्याची  बॅंक खाती सील करण्यात आली आहेत.  तहसीलदार अनिल गावीत यांनी सोमवारी हे आदेश काढले. 
हा कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्वावर देण्यात आला आहे.

तब्बल १३ कोटी १३ लाख रुपये एवढी रक्कम कारखान्याकडे थकबाकी आहे.  ही रक्कम  जोपर्यत शेतकऱ्यांना दिली जात नाही, तोपर्यंत खाती सील असतील. तसेच कारखान्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता अटकावून ठेवण्याचे अधिपत्र बजावण्यात आले आहे.  बँक खाती सील करण्याची कारवाई मंडळ अधिकारी एस. एल. पाटील आणि तलाठी दीपाली येसे यांनी केली. कारखान्याचे चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक मंडळ यांचे बंधन बँक चोपडा आणि बुलढाणा अर्बन सोसायटी व इतर बँकांममधील खाती सील करण्यात आली आहेत. 

 एफआरपीनुसार शेतकऱ्यांची रक्कम कारखान्याकडे घेणे बाकी आहे. याबाबत औरंगाबाद खंडपीठाचेही  तसे आदेश आहेत. शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळावी,  यासाठी बँक खाती सील करण्यात आली आहेत. -अनिल गावीत, तहसीलदार, चोपडा.

Web Title: Seal the bank accounts of the Chopda Sugar Factory; Consequences of non-payment to farmers as per FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव