सातपुड्याच्या माळरानातील जिन्सी सांबरपाट येथील श्री उमामहेश्वर महादेव मंदिरात फुलतोय शिवभक्तीचा सागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:24+5:302021-08-23T04:20:24+5:30

अनेक वर्षांच्या कठीण तपोसाधनेची फलश्रुती म्हणून त्यांनी श्री उमामहेश्वर महादेवाचे शिवलिंग साकारून त्या ठिकाणी साक्षात गंगोत्री मातेला अवतरून जलाभिषेक ...

Sea of Shiva devotion blooms in Shri Umamaheshwar Mahadev Temple at Jinsi Sambarpat in Malrana of Satpuda | सातपुड्याच्या माळरानातील जिन्सी सांबरपाट येथील श्री उमामहेश्वर महादेव मंदिरात फुलतोय शिवभक्तीचा सागर

सातपुड्याच्या माळरानातील जिन्सी सांबरपाट येथील श्री उमामहेश्वर महादेव मंदिरात फुलतोय शिवभक्तीचा सागर

अनेक वर्षांच्या कठीण तपोसाधनेची फलश्रुती म्हणून त्यांनी श्री उमामहेश्वर महादेवाचे शिवलिंग साकारून त्या ठिकाणी साक्षात गंगोत्री मातेला अवतरून जलाभिषेक केल्याचा शिवमहिमा शिवभक्तांमध्ये सर्वश्रुत झाल्याने श्री उमामहेश्वर सुस्वरूप श्री श्री श्री १००८ महंत श्री नवरतनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी राज्यातील तथा मध्य प्रदेशातील भाविकांची गर्दी लोटू लागली. सात्त्विक, धार्मिक, सद्भाव, सत्शील, सदाचारी अशा भाविकांची मनोकामना पूर्ण करताना उमामहेश्वर सुस्वरूप श्री श्री श्री १००८ महंत श्री नवरतनगिरी महाराज यांनी अनेक भाविकांच्या संसाररूपी भवसागरात उद्धार केल्याचे मूर्तिमंत दाखले शिष्यगणात आजही नावारूपाला आले आहेत.

निस्सीम भक्तांना साक्षात्कार घडवताना त्यांनी नवरात्रोत्सवात वाघाचे दर्शन, उमामहेश्वर महादेव मंदिरात भल्यामोठ्या नागदेवतेचे दर्शन, श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन, श्री दुर्गादेवीचे तथा भगवान हनुमंतांचे दर्शन घडल्याच्या दिव्यानुभूती शिवभक्तांमधून वर्णिली जात आहेत.

त्यांचे गादीपती म्हणून श्री १०८ महंत गणेशगिरी महाराज हे त्यांचा वारसा चालवत आहेत.

महाशिवरात्रीसह श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची मोठी मांदियाळी फुलत असते. श्री उमामहेश्वर महादेव मंदिर शिवधामात स्वामी श्री मनोजगिरी महराज, स्वामी श्री हरिहरगिरी महाराज, श्री स्वामी परमानंद गिरी महाराज, श्री स्वामी गिरिजागिरी महाराज, श्री स्वामी सत्यमगिरी महाराज, श्री स्वामी गोलूगिरी महाराज, सेवेकरी एन. डी. पाटील, कांतीलाल महाराज हे अविरत सेवा बजावत आहेत. श्रावण सोमवारनिमित्ताने बहुसंख्य भाविक रुद्राभिषेक, महाप्रसाद, लघुरुद्र पूजा अशी सेवा समर्पित करीत असल्याने या शिवधामाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

चौकट : आसाम राज्यातील जुना आखाड्याचे चंद्रगिरी महाराजांची लाभली सद्गुरू सेवा... श्री उमामहेश्वर सुस्वरूप श्री श्री श्री १००८ महंत श्री नवरतनगिरी महाराज यांच्या जुना आखाड्याचे परमस्नेही आसाममधील श्री चंद्रगिरी महाराज यांची सद्गुरू सेवा सद्यस्थितीत लाभली आहे.

Web Title: Sea of Shiva devotion blooms in Shri Umamaheshwar Mahadev Temple at Jinsi Sambarpat in Malrana of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.