शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

युवकांना सक्षम करण्याचा ‘एसडी- सीड’चा प्रयत्न - सुरेशदादा जैन यांची पत्रपरिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:52 IST

रविवारी शिष्यवृत्ती वितरण सोहळा

ठळक मुद्दे१३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभयंदा १७५ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न

जळगाव : एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजनेंतर्गत युवकांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न असून यंदा गरजू आणि गुणवंत सुमारे ६०० विद्यार्थ्यांना रविवार, १८ रोजी शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवारी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रपरिषदेत दिली.७, शिवाजीनगर या त्यांच्या निवासस्थानी पत्रपरिषद झाली. यावेळी संस्थेचे गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, मार्गदर्शक छबीलभाई शहा, राजेश यावलकर उपस्थित होते. यावेळी सुरेशदादा जैन यांनी या उपक्रमाची तसेच कार्यक्रमाची माहिती दिली.१३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभजिल्ह्यातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण निर्विघ्नपणे पूर्ण करावे, स्वत:ला सक्षम बनवावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना जून २००८ मध्ये सुरु करण्यात आली. योजनेबाबत सुरेशदादा म्हणाले, आतापर्यंत १३००० हून अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. एकूण ३१०० हून अधिक विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्याशिवाय ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तसेच २००० हून अधिक युवतींना भावनिक, मानसिक सबलीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थी हितासाठी १२९ संस्थांसोबत सहकार्य करार केले असून अनेक विद्यार्थी त्या सुविधांचा लाभ घेत आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन आणि जॉब फेअर,कॅम्पस इंटव्ह्यू आणि उद्योजकता विकास शिबिरांचे नियमित आयोजन करून नवनवीन रोजागाराच्या व उद्योगाच्या संधींची उपलब्धता करून दिली जात आहे. गुणवत्ता आणि गरजेनुसार ५ ते ५० हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते.यंदा १७५ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्नमागील वर्षी सुरेशदादा जैन यांनी विद्यार्थी दत्तक योजना जाहीर केली होती. या योजनेस समाजातून विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला असून ३७ विद्यार्थ्यांना दत्तक घेवून सक्रीय सहभाग नोंदवला गेला आहे. यंदा सुरेशदादा जैन यांचे अमृत महोत्सवी वर्ष असून या शैक्षणिक वर्षात लोकसहभागातून १७५ विद्यार्थ्यांना दत्तक योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. रेदासनी यांनी यावेळी सांगितले.अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळावे यासाठी संस्थेतर्फे प्रतापनगरातील रत्ना जैन विद्यालयात ५० आसनांची अभ्यासिकाही सुरु करण्यात आली आहे. माफक दरात अभ्यासिकेत प्रवेश देण्यात येत आहे. सकाळी ८ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ अशा दोन सत्रात वेळ ठेवण्यात आली आहे. यानुसार विविध भागात अभ्यासिका सुरु करावयाच्या असून यासाठी सेवाभावी व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहनही सुरेशदादा जैन यांनी केले आहे.हणमंतराव गायकवाड व विजय दर्डा यांची मुख्य उपस्थितीशिष्यवृत्ती वितरणाचा हा सोहळा रविवारी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भारत विकास ग्रुपचे (बी.व्ही.जी.)संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड (पुणे) आणि ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांची मुख्य उपस्थिती असेल. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव