चोरीची भांडी खरेदी प्रकरणी भंगार व्यावसायिक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:19 IST2021-08-29T04:19:03+5:302021-08-29T04:19:03+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील भांडी व्यावसायिक राजेंद्र शंकर मुळे यांच्या बाजारपेठेतील भांड्यांच्या ...

Scrap dealer arrested for buying stolen utensils | चोरीची भांडी खरेदी प्रकरणी भंगार व्यावसायिक ताब्यात

चोरीची भांडी खरेदी प्रकरणी भंगार व्यावसायिक ताब्यात

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील भांडी व्यावसायिक राजेंद्र शंकर मुळे यांच्या बाजारपेठेतील भांड्यांच्या दुकानातून ७ ते ९ ऑगस्टदरम्यान चोरट्यांनी ४७ हजार रुपये किमतीची भांडी लांबविली होती. बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी आकाश ऊर्फ चॅम्पियन श्याम इंगळे (२१) रा. आठवडी बाजार व

आसीफ शहा शरीफ शहा (३२) रा. काझी प्लॉट यांना २४ ऑगस्ट रोजी अटक करीत त्यांच्याकडून १६ हजार १२० रुपये किमतीचा माल जप्त केला होता. संशयिताने उर्वरित भांडी भंगार व्यावसायिक शेख बिस्मिल्ला ऊर्फ बिसू शेख माली (४०) रा. पंचशीलनगर यास विकल्याची कबुली दिल्यानंतर माळी यास शुक्रवारी अटक करण्यात आली व त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीची भांडी जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Scrap dealer arrested for buying stolen utensils