शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मुलांच्या ‘आरटीई’ प्रवेशासाठी पालकांकडून ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:32 IST

शिक्षणासाठीही बनवाबनवी : मूळ रहिवाशांचे पाल्य राहिले वंचित; पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव : मोफत आणि सक्तीचा शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांमध्ये देण्यात येणाºया २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र, दुसरीकडे काही पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी जळगाव तालुक्यातील वावडदा येथे वास्तव्यास नसतानाही भाडेकरू दाखवून प्रवेशास पात्र ठरल्याचा धक्कादायक प्रकार मूळ गावातील पालकांच्या तक्रारीनंतर समोर आला आहे़ याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून १३ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे़आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल, वंचित घटकांतील मुलांना खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार यंदा आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २८७ शाळांमध्ये ३ हजार ५९४ जागा आहेत़ त्यासाठी ८ हजार ४६३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते़ त्यापैकी ३ हजार ३४१ विद्यार्थी प्रथम फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत़गावातील विद्यार्थी प्रतीक्षा यादीतप्रवेशासाठी लवकर क्रमांक लागावा, त्याचबरोबर हवी ती शाळा मिळावी म्हणून १३ पालकांनी वावडदा येथे भाडेतत्वावर राहत असल्याचे दाखवून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदविला व त्यात त्यांच्या पाल्यांना लॉटरीही लागली़ दुसरीकडे मात्र, मूळ गावात राहत असलेल्यांच्या पाल्यांचे नाव प्रतीक्षा यादीत गेले़ त्यात रेणूका पाटील, ओम संदीप पवार, श्रेयस पवार, वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ दरम्यान, या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले, त्यांचे पालक वावडदा गावातच वास्तव्यास नसून त्यांनी बनावट भाडेकरू दाखवून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोदविल्याचा प्रकार निदर्शनास आणून दिला.ते पालक गावात राहत नसल्याचे सरपंचांचे पत्रज्या विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे, त्यांच्या पालकांनी वावडदा सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गावात संपूर्ण चौकशी पाहणी केली असता जे १३ विद्यार्थी एल़एच़पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरले आहे, त्यांचे पालक गावात राहतच नसल्याचे समोर आले़ त्यानंतर सरपंचांनी याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून प्रवेशास पात्र ठरलेल्या त्या विद्यार्थ्यांचे पालक गावात राहत नसल्याचे पत्र दिले आहे़शिक्षण विभागाकडे तक्रार प्राप्तवावडदा सरपंच यांनी केलेली तक्रार शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे़ त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ तर संबंधित शाळेलाही चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़पत्ता बदलविण्यासाठी धडपडशहरातील काही पालकांकडूनही लवकरात लवकर आरटीई प्रवेशासाठी क्रमांक लागवा म्हणून आधारकार्डमधील पत्त्यांमध्ये बदल करण्यासाठी धडपड सुरू असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे़ तर काहींनी शाळेच्या काही अंतरावरचं घर असल्याचे दाखवून काही पालकांकडूनही ‘शाळा’ केली जात असल्याचा समोर येत आहे़ज्या पालकांनी चुकीची माहिती भरली असेल, त्यांच्या पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील़ प्रवेश रद्द करण्याचा अधिकार हा गटशिक्षणाधिकारी यांनाही आहे़- बी़एस़अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव