शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

जळगाव जिल्ह्यात वाहनांअभावी 10 दिवसांपासून शालेय आरोग्य तपासणी ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 8:42 PM

आता लघु निविदा : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाच्या वाहनांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया

ठळक मुद्देतात्पुरती तपासणीउघडलेल्या निविदा अखेर रद्दनव्याने निविदा प्रक्रिया

ऑनलाईन लोकमत 

जळगाव : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्याथ्र्याच्या आरोग्य तपासणीसाठी असलेल्या पथकांच्या वाहनांची  निविदा प्रक्रिया रखडल्याने वाहनांअभावी 1 सप्टेंबरपासून ठप्प झालेली शालेय आरोग्य तपासणी 10 दिवसानंतरही  सुरळीत झालेली नाही. यासाठी उघडलेल्या निविदा रद्द करण्यात आल्या असून आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.  दरम्यान, सोमवार, 4 सप्टेंबर्पयत सर्व सुरळीत होईल, असे  अधिका:यांच्यावतीने सांगण्यात आले होते, मात्र आठवडा उलटला तरी  ‘जैसे थे’ परिस्थिती असल्याने  विद्याथ्र्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ पाहत आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र सरकारच्यावतीने अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळांमधील 16 वर्षे वयोगटार्पयतच्या विद्याथ्र्यांच्या आरोग्य तपासणीसाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविला जातो. यासाठी जळगाव जिल्ह्यात 40 पथके आहेत.  या पथकाला देण्यात येणारे वाहन कंत्राटी पद्धतीवर लावले जातात. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात लावण्यात आलेल्या वाहनांचा कंत्राट एप्रिल महिन्यातच संपला. मात्र निविदा न काढल्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ती मुदतदेखील 31 ऑगस्ट रोजी संपली. 

उघडलेल्या निविदा अखेर रद्दआरोग्य तपासणीचे वाहने थांबल्यानंतर आलेल्या दोन निविदा उघडण्यात आल्या ख:या मात्र त्याही रद्द कराव्या लागल्या. प्रति किलोमीटर प्रमाणे निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये  एक निविदा 32 रुपये प्रति किलोमीटर तर दुसरी 22 हजार 790 रुपये दराप्रमाणे आली. दुसरी निविदा महिना भराच्या हिशेबाने भरण्यात आली की काय हे समजू शकले नाही, मात्र प्रति किलोमीटर दराने निविदा मागवूनही  त्या प्रमाणे न आल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे आता लघु निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून सात दिवसांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण होईर्पयत विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी ठप्प राहणार असल्याचे चित्र आहे. 

तात्पुरती तपासणीजिल्ह्यात ज्या ठिकाणी तपासणीची गरज आहे, तेथे तात्पुरत्या स्वरुपात वाहने घेऊन विद्याथ्र्याची आरोग्य तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले. 

दोनच निविदा आल्याने व त्यात दोघींच्या दरामध्ये प्रचंड तफावत असण्यासह एक निविदा मागविल्याप्रमाणे नसल्याने त्या रद्द करण्यात आल्या. आता लघु निविदा (शॉर्ट  टेंडर) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात गरज आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात वाहने लावून विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.