शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: January 14, 2015 15:07 IST2015-01-14T15:07:53+5:302015-01-14T15:07:53+5:30

तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

School girl's suicide attempt | शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

>जळगाव : 'तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने व मोबाइलवर खेळल्याबाबत आई रागावल्याने नंदिनीबाई मुलींचे विद्यालयातील आठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने (वय १२ वर्ष, रा.दीक्षितवाडी) मंगळवारी दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास स्वत:च्या रहात्या घरात गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तिचे पालक घरी पोहोचल्याने त्यांनी तिला वाचविले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, दोन दिवसात युवक तसेच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याच मार्गावर जाण्याची ही जिल्ह्यातील तिसरी घटना असल्याने ही बाब विचार करायला लावणारी आहे.
---------
ती' हुशार असताना संस्कृत विषयात तिला १00 पैकी शंभर गुण मिळाल्याचे तिच्या आईने सांगितले. तिचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक तर आई शिकवणी वर्ग घेते. तिच्या भविष्यावर परिणाम होऊ नये म्हणून 'लोकमत'ने या विद्यार्थिनीचे नाव व छायाचित्र प्रसिद्ध केलेले नाही. पंख्याला गळफास घेतल्याचे दिसताच शिक्षक असलेल्या वडिलांना दिसताच त्यांनी तिला आधार देत खाली उतरविले. तिच्या गळ्याला फास घट्ट आवळला गेला होता. ती सध्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घटना कळताच तिचे नातलग दवाखान्यात दाखल झाले. मैत्रिणीचे पालक निघून गेल्यानंतर त्या विद्यार्थिनीला वाईट वाटल्याचे तिच्या पालकांना सांगितले. पालकांनी आम्ही तुला रागावलोय का? तुला वाईट वाटू देऊ नकोस, अशा शब्दात तिला समजावलेही. त्यातच मंगळवारी ती मोबाइलवर गेम्स खेळत होती. त्या वेळेस मोबाइलवर खेळू नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे, परीक्षेत गेल्या वर्षीपेक्षा कमी गुण मिळायला नकोत, अशा शब्दात आई तिला रागावली. नंदिनीबाई विद्यालयात शिकणार्‍या मैत्रिणीच्या घरी ती विद्यार्थिनी अभ्यास करायला जात होती. सोमवारी अचानक मैत्रिणीसह तिचे वडील दीक्षितवाडीत रहाणार्‍या त्या विद्यार्थिनीच्या घरी आले. मैत्रिणीच्या वडिलांनी 'तुमची मुलगी अंगावर तोकडे कपडे घालून आमच्या घरी येते. ही बाब चांगली नाही. त्याचा आमच्या मुलीवर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे तुमच्या मुलीला आमच्या घरी तसे पाठवू नका, असे त्या विद्यार्थिनीसमोर तिच्या पालकांना सुनावले.

Web Title: School girl's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.