कलाकार घडविणारे शालेय गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:42+5:302021-09-10T04:21:42+5:30
आम्ही तयार झालो. कलाक्षेत्रात पुढे येत, फेस्टिवल्समध्ये सहभागी होत नाव कमावते झालो. असो़ तर, शाळेतील प्रत्येक ...

कलाकार घडविणारे शालेय गणेशोत्सव
आम्ही तयार झालो. कलाक्षेत्रात पुढे येत, फेस्टिवल्समध्ये सहभागी होत नाव कमावते झालो. असो़ तर, शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एखाद्या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी, त्या क्षेत्रात सर्वोत्तम प्रगती करण्यासाठी आलेला असतो़ तेव्हा त्या त्या क्षेत्राची व्यवस्थित ओळख करून त्याचे कौशल्य वाढवणे, ही त्या शाळेतील सर्व शिक्षकांची जबाबदारी आहे़. महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांनी ती जबाबदारी समर्थपणे उचलत शालेय कार्यक्रमांतून कलाकार घडविले आहेत.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करताय, जी बाब खरंच सुखावह आहे़ असो शवेटी महत्त्वाची गोष्ट समोर ठेवत सांगायचं तर, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्तातून अमूर्ताकडे,आहेकडून, असावेकडे, दुर्बलतेतून आत्मविश्वासाकडे आणि आनंदाकडून आनंदाकडे जाणाऱ्या या सर्व शालेय उपक्रमांना, सण-उत्सवांना मुलांच्या दृष्टीने खूपच महत्त्व आहे़ तेव्हा ते जाणा, करत राहा! राज्यातील अनेक गावांनी, शाळांनी शेकडो कलावंत देत कलाक्षेत्र समद्ध केले आहे. त्यात सर्वच कलाप्रकार आहेत. नाट्यविश्वासह विविध कलांमध्ये प्रावीण्य मिळवित देश-विदेशात नाव कमावलेल्या किती दिग्गज कलावंतांची नावे घ्यावीत. लेझीम ढोल पथकासह निघणारी बाप्पांची
विसर्जन मिरवणूक... सारं कसं भारावलेले वातावरण होतं. शाळेने विविध सण -उत्सवाद्वारे जो आनंद द्विगुणीत केला तो खरच मस्त.