शालेय बसला अपघात, तीन जखमी

By Admin | Updated: October 25, 2015 00:26 IST2015-10-25T00:26:31+5:302015-10-25T00:26:31+5:30

स्कूलबसवरील चालकाचा ताबा सुटल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नंदुरबारनजीक लोणखेडा फाटय़ाजवळ घडली.

School Bus Accident, Three Wounded | शालेय बसला अपघात, तीन जखमी

शालेय बसला अपघात, तीन जखमी

नंदुरबार : भरधाव स्कूलबसवरील चालकाचा ताबा सुटल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना नंदुरबारनजीक लोणखेडा फाटय़ाजवळ घडली. दोन विद्याथ्र्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका विद्याथ्र्याला उपचार करून घरी सोडण्यात आले. शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलची ही बस होती.

पोदार स्कूलची बस (क्रमांक एमएच 05- आर 360) विद्याथ्र्याना घेऊन नंदुरबारहून वेलदा, आडची येथे जात होती. लोणखेडा फाटय़ाजवळील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला उलटली. त्यानंतर झाडाला ठोकली जाऊन बसचे छत पूर्णपणे वाकले. सुदैवाने बसमध्ये तीनच विद्यार्थी होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यात साहिल योगेश पटेल, रा.वेलदा व जिगAेश वसंत पटेल, रा.अडची यांचा समावेश आहे. एका विद्याथ्र्याला उपचार करून घरी सोडण्यात आले.

अपघात झाल्याची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. शिवाय विद्याथ्र्याना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनीदेखील रुग्णालयात धाव घेतली.

शनिवारी मोहरमची सुटी असल्याने फारसे विद्यार्थी शाळेत नव्हते. जे विद्यार्थी बसमध्ये होते ते अतिरिक्त क्लाससाठी स्कूलमध्ये गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शाळा व्यवस्थापनाकडून मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, खासगी स्कूलबसचा गेल्या तीन महिन्यातील हा तिसरा अपघात आहे.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: School Bus Accident, Three Wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.