शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आता हॉल तिकिटावरच असेल वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:18 IST

दहावी १८ फेबु्रवारी तर बारावीचे पेपर ३ मार्चपासून : यंदा १ लाख १३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने येत्या १८ फेब्रुवारीपासून बारावी तर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातील १ लाख १३ हजार ४७३ विद्यार्थी असतील.यंदा बारावीचे ४९ हजार ४०३ तर इयत्ता दहावीचे ६४ हजार ७० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने बारावीसाठी ७१ तर दहावीेसाठी १३४ केंद्रे असतील.दहावीसाठी १८ तर बारावीसाठी २२ परीरक्षक असतील. दरम्यान, नुकतीच दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात नाशिक बोर्डात अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत़ तर उपद्रवी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचेही आदेश केले आहे़

नाशिक विभागातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेधनाशिक विभागातून दहावी आणि बारावी परीक्षेला ३ लाख ८२ हजार ९२२ विद्यार्थी असतील. त्यात नाशिक जिल्ह्यात दहावीसाठी ९७ हजार ९३४ तर बारावीसाठी ७५ हजार ३४३, धुळे जिल्ह्यातील दहावीसाठी ३१ हजार ८३७ तर बारावीसाठी २५ हजर २६४, नंदुरबार जिल्ह्यातून दहावीसाठी २२ हजार ६०३ तर बारावीसाठी १६ हजार ४६८, जळगाव जिल्ह्यातील दहावीसाठी ६४ हजार ७० व बारावीसाठी ४९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे़ दहावीची एकूण ४४५ आणि बारावीच्या परीक्षेसाठी २३४ केंद्र असतील.

हॉलतिकीटावर वेळापत्रकमराठी विषयाच्या पेपराने दहावी तर इंग्रजी विषयाच्या पेपराने बारावीची परीक्षा प्रारंभ होईल़ दरम्यान, शिक्षण मंडळाने घेतलेल्या अभिनव निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगली मदत होणार आहे़ विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक आणि प्रवेशपत्र एकच आहेत़ परीक्षेचा विषय व तारीख तसेच सत्राची ठळक नोंद प्रवेश पत्रावर करण्यात आली आहे़ त्यामुळे आपला कुठला पेपर कोणत्या दिवशी हे विद्यार्थ्यांना हॉल तिकीटावरूनच कळण्यास मदत होईल़

पर्यवेक्षकावर कारवाईचा बडगाएकाच वर्गात पाच पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे़जिल्ह्यात ३९ उपद्रवी केंद्रेव्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल होणे, टवाळखोरांकडून कॉपी पुरविणे, गोंधळ होणे असे आदी प्रकार घडणाºया उपद्रवी केद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष असेल. जिल्ह्यात असे एकूण ३९ उपद्रवी केंद्र असून दहावीचे २० तर बारावीचे १९ उपद्रवी केंद्र आहे़ याठिकाणी बैठे पथक असेल.सात भरारी पथकांची नजर... या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सात भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक जिल्हाभरातील सर्व केंद्रांवर टप्प्याटप्याने धाडी टाकणार आहेत. या भरारी पथकांमध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्राचार्य डायट, जेष्ठ अधिव्याख्याता डाएट तसेच महिला भरारी पथकाचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक विषयासाठी व प्रत्येक केंद्रांवर पेपरच्या कालावधीमध्ये पूर्ण तीन तास बैठे पथकही कार्यरत राहणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हा दक्षता समिती सदस्य अचानक परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देवू शकतात़ 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव