विखुरलेली नाणी पुन्हा बंगळुरूला!

By Admin | Updated: November 5, 2015 00:05 IST2015-11-05T00:05:18+5:302015-11-05T00:05:18+5:30

वर्शी : मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणे गावाजवळ मंगळवारी सकाळी ट्रकला अपघात होऊन रस्त्यावर विखुरलेली कच्ची नाणी पंचनाम्यानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा बंगळुरूकडे रवाना करण्यात आली.

Scattered coins again Bangalore! | विखुरलेली नाणी पुन्हा बंगळुरूला!

विखुरलेली नाणी पुन्हा बंगळुरूला!

वर्शी : मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणे गावाजवळ मंगळवारी सकाळी ट्रकला अपघात होऊन रस्त्यावर विखुरलेली कच्ची नाणी पंचनाम्यानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा बंगळुरूकडे रवाना करण्यात आली. या नाण्यांचा विमा काढलेला असल्याने बुधवारी सकाळी विमा कंपनीच्या अधिका:यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

बंगळुरू येथून नोएडाकडे कच्ची नाणी घेऊन निघालेल्या ट्रकला मंगळवारी सकाळच्या अपघातानंतर पोलिसांनी विखुरलेली नाणी व ड्रम रस्त्याच्याकडेला लावून ठेवली होती. रात्रभर त्या ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी व ट्रकच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चार कर्मचा:यांनी पहारा दिला. नाण्यांचा विमा काढला असल्याने संबंधित (ओरिएन्टल इन्शुरन्स) विमा कंपनीचे सव्र्हेअर विक्रम पाटील, ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक बालकिसन सोनी यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

4 ही नाणी गौतमबुद्धनगर, नोएडा येथील सरकारी टांकसाळीकडे नेण्यात येत होती.

4ट्रकमध्ये एकूण 30 ड्रम होते. नाण्यांसह एका ड्रमचे वजन 735 किलोग्रॅम एवढे होते. 20 ड्रममधील नाणी रस्त्यावर विखुरली होती.

4नाणी सुरक्षित ठेवण्यासाठी नरडाण्याचे एपीआय साहेबराव जाधव, पीएसआय भरत काळे, पोलीस नाईक वासुदेव जगदाळे, एस.बी. पवार, सुनील मोरे, संजय शिरसाठ, अनिल शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Scattered coins again Bangalore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.