सव्वा लाखाचे दागिने लंपास
By Admin | Updated: June 13, 2014 15:00 IST2014-06-13T15:00:21+5:302014-06-13T15:00:21+5:30
शहरातील घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून बुधवारी अशोक नगरातील नितीन रवींद्र वाणी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार ८00 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले.

सव्वा लाखाचे दागिने लंपास
जळगाव : शहरातील घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून बुधवारी अशोक नगरातील नितीन रवींद्र वाणी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख १९ हजार ८00 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले.
हॅपीटेशन ज्वेलरीचे मालक नितीन वाणी यांच्या अयोध्यानगरातील दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या अशोक नगरातील बंद असलेल्या घराचे ११ जून रोजी दुपारी १२.३0 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून १ लाख १९ हजार ८00 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.
२५ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, ३0 हजार रुपयांच्या प्रत्येक पाच ग्रॅम वजनाच्या तीन अंगठय़ा, १0 हजार रुपयांची सोन्याची चैन, १0 हजाराची सोन्याची अंगठी, २ ग्रॅमची सोन्याची चीप, ८00 रुपयांचा चांदीचा गोफ आणि रोख पंधरा हजार रुपयांचा समावेश आहे. यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे.
वाणी यांनी या संदर्भात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.