सावित्रीबाई बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST2021-01-04T04:13:31+5:302021-01-04T04:13:31+5:30

लेवा एज्युकेशन संचलित श्रीमती शांताबाई लक्ष्मणराव खडके प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक अंजना सुरवाडे यांच्या हस्ते त्यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे ...

Savitribai News Add | सावित्रीबाई बातमी जोड

सावित्रीबाई बातमी जोड

लेवा एज्युकेशन संचलित श्रीमती शांताबाई लक्ष्मणराव खडके प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक अंजना सुरवाडे यांच्या हस्ते त्यांच्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थांना सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच मनाचे श्लोक, रामरक्षा आदी स्पर्धाही घेण्यात आल्या.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे महिला तालुकाध्यक्ष निकिता सोनवणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शोभना भालेराव, निशा अडकमोल, यशवंत घोडेस्वार, सिद्धार्थ गव्हाणे, प्रवीण परदेशी, अजीज शेख, फिरोज पिंजारी, रवींद्र जाधव, नरेंद्र सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

समता जागृती बहुउद्देशीय संस्था

समता जागृती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्ते आनंदा तायडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव, गौतम सपकाळे, राजू सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Savitribai News Add