विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वाचवले
By Admin | Updated: March 6, 2017 00:39 IST2017-03-06T00:39:50+5:302017-03-06T00:39:50+5:30
देवळसगाव : आठ तास शर्थीचे प्रय}

विहिरीत पडलेल्या बिबटय़ाला वाचवले
जामनेर : तालुक्यातील देवळसगाव शिवारात विहिरीत पडलेल्या दीड वर्षे वयाचा नर जातीचा बिबटय़ा जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिका:यांना आठ तास शर्थीचे प्रय} केल्यावर यश आले आहे. बिबटय़ाला ताब्यात घेतल्यावर वनअधिका:यांनी त्याला जळगाव येथे रवाना केल्याचे सूत्रांनी सांगितले.
देवळसगाव शिवारात संजय पाटील व राजू पाटील (रा.रांजणी) हे दोघे भाऊ सकाळी 9 वाजेच्या सुमारास आपल्या शेतामध्ये कपाशीला पाणी देण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करण्यास गेले. तेव्हा विहिरीतून बिबटय़ाची डरकाळी त्यांना ऐकू आली. ते दोघेही घाबरले आणि इकडे तिकडे पाहू लागले. पण त्यांना कुठेही बिबटय़ा आढळून आला नाही. मात्र, थोडय़ाच वेळात तोच आवाज पुन्हा त्यांच्या कानावर पडला. मात्र, या वेळी हा आवाज विहिरीतून आला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता 40 फूट खोल असलेल्या विहिरीच्या काठावर बिबटय़ा बसलेला त्यांना दिसला. लागलीच त्यांनी वनविभागाच्या अधिका:यांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी एस.आर. पाटील व सपोनि विशाल पाटील घटनास्थळी सहका:यांसह रवाना झाले. वनविभागाच्या अधिका:यांनी सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेर्पयत बिबटय़ाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रय} करून अखेर यश मिळवले. यासाठी पोलीस पाटील, राजेश अग्रवाल, भाजपचे राजू अजमेरे व ग्रामस्थांनी सहकार्य केले.