वाचवा...नाही तर तो मारुन टाकेन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:12 PM2019-08-14T21:12:19+5:302019-08-14T21:18:02+5:30

वैजापूर येथे अत्याचार झालेल्या सहा वर्षाच्या बालिकेवर बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली तर दुस-या बहिणीवरही उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्याचारानंतर पीडित बालिकेने रस्त्याने जाणाºया दाम्पत्याला थांबवून त्यांचे पाय धरले...आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन अशी विनवण्या करायला लागल्याने या घटनेचे बींग फुटले.

Save it ... otherwise it will kill! | वाचवा...नाही तर तो मारुन टाकेन !

वाचवा...नाही तर तो मारुन टाकेन !

Next
ठळक मुद्देवैजापूरची अत्याचारीत बालिका बचावासाठी करीत होती विनवण्याबालिकेवर तातडीची शस्त्रक्रियाघटनेच्या निषेधार्थ दोन दिवस मोर्चा
ref='https://www.lokmat.com/topics/jalgaon/'>जळगाव : वैजापूर येथे अत्याचार झालेल्या सहा वर्षाच्या बालिकेवर बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली तर दुस-या बहिणीवरही उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, अत्याचारानंतर पीडित बालिकेने रस्त्याने जाणाºया दाम्पत्याला थांबवून त्यांचे पाय धरले...आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन अशी विनवण्या करायला लागल्याने या घटनेचे बींग फुटले. चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता देवेंद्र राजेंद्र भोई (२२, रा.वैजापूर) याने एका सहा वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला तर दुस-या चुलत बहिणीवरही अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान, तिसरी मुलगी तेथून पळून गेल्याने ती बचावली आहे. संशयित देवेंद्र भोई याला मध्यरात्री दीड वाजता पोलिसांनी अटक केली आहे. दोन सख्या बहिणी व एक त्यांची मैत्रिण अशा तिघं जण गावाबाहेर शौचास गेल्या असता देवेंद्र याने ही संधी साधून कुकर्म केले. त्यात एका बालिकेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.वाचवा, नाही तर तो मारुन टाकेन !घटना घडली तेव्हा दुचाकीचा आवाज ऐकून संशयित तेथून पळून गेला. रस्त्याने दुचाकीने जात असलेल्या गावातीलच दाम्पत्याला या बालिकेने थांबविले, आणि त्यांचे पाय धरले. आम्हाला वाचवा..तो मारुन टाकेन असे बोलत होते. यावेळी दोन्ही बहिणी प्रचंड भेदरलेले होत्या तर एकीचा रक्तस्त्राव सुरु होता. हा प्रकार पाहून या दाम्पत्याने दोघांना गावात आणले नंतर गावक-यांनी वैजापूर आरोग्य केंद्रात नेले. तेथे तपासणीअंती बालिकेवर अमानूष पध्दतीने अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या माध्यमातून या दोन्ही बहिणींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.संपूर्ण गाव मुलींजवळ संशयित घरातदोन सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार झाल्याची माहिती गावात पसरताच संपूर्ण गाव दोन्ही बहिणींच्या घरी जमले. हा प्रकार कोणी केला याचीच चर्चा सुरु असताना देवेंद्र भोई व त्याचे कुटुंब घरात होते. संपूर्ण गाव एका ठिकाणी तर फक्त संशयितच घरात होता. पलायन केलेल्या तिस-या मुलीने संशयिताचे नाव सांगितले व नंतर त्याला ओळखलेही. त्यामुळे रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. घटनेच्या निषेधार्थ दोन दिवस मोर्चाया घटनेच्या निषेधार्थ तसेच संशयिताविरुध्द अ‍ॅट्रासिटीचे वाढीव कलम लावावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा व त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी १५ आगस्ट रोजी आदीवासी वसतीगृह विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. १६ आॅगस्ट रोजी सकाळी वाजता लोकसंघर्ष मोर्चा व इतर विविध संघटना यांच्यावतीने चोपडा येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात सहभागाचे आवाहन डॉ.चंद्रकांत बारेला, प्रतिभा शिंदे, प्रकाश बारेला, संजय शिरसाठ, बुधा बारेला, गाजू बारेला, धर्मा बारेला, प्रदीप बारेला, संदीप मोरे, मोतीलाल बारेला, ज्ञानेश्वर भादले, रघुनाथ जोशी, सचिन धांडे, विनोद देशमुख, संजू बारेला, दयाराम बारेला,दिनू बारेला यांनी केले आहे.

Web Title: Save it ... otherwise it will kill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.