राजस्थानी ब्राह्मण संघ महानगरध्यक्षपदी सत्यनारायण खटोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:15 IST2021-02-14T04:15:57+5:302021-02-14T04:15:57+5:30
जळगाव : राजस्थानी ब्राह्मण संघाच्या महानगरध्यक्षपदी सत्यनारायण खटोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष घनश्याम नागौरी यांनी ...

राजस्थानी ब्राह्मण संघ महानगरध्यक्षपदी सत्यनारायण खटोड
जळगाव : राजस्थानी ब्राह्मण संघाच्या महानगरध्यक्षपदी सत्यनारायण खटोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष घनश्याम नागौरी यांनी खटोड यांचे नाव सुचविले. माजी अध्यक्ष विश्वनाथ जोशी यांनी अनुमोदन केले. अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर खटोड यांनी ब्राह्मण समाजातील युवकांसाठी १० ते १४ मार्चदरम्यान ‘परशुराम चषक’ क्रिकेट स्पर्धा घेण्याची घोषणा केली. तसेच सर्व राजस्थानी ब्राह्मण समाजात वधू-वर परिचय मेळावा घेण्याचे व वर्षभरात समाजभवन बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्याचेही आश्वासन दिले. दरम्यान, यावेळी निवड झालेल्या कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी गोपाळ पंडित, सचिव शिवप्रसाद शर्मा, कोषाध्यक्ष महेंद्र पुरोहित, उपाध्यक्ष संजय व्यास, महावीर पंचारिया, सर्वजित शर्मा, दीपक जोशी, संघटन मंत्री शिवप्रसाद रामावत, गोविंद ओझा, विनोद त्रिपाठी यांची निवड करण्यात आली आहे.