आयएमएतर्फे सोमवारी ‘सत्याग्रह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:15 IST2017-10-02T00:13:31+5:302017-10-02T00:15:46+5:30
डॉक्टरांचे उपवास : वैद्यकीय सेवा सुरू राहणार

आयएमएतर्फे सोमवारी ‘सत्याग्रह’
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 1 - इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपयर्ंत देशभरातील डॉक्टर्स विविध मागण्यांसाठी उपवास करून सत्याग्रह आंदोलन करणार आहेत. या दिवशी मात्र, सर्व डॉक्टर्स आपआपली वैद्यकीय सेवा दिवसभर सुरू ठेवणार आहे.
जळगाव शाखेतर्फे सूर्योदय ते सूर्यास्तार्पयत आयएमए हाऊस येथे आयएमएचे काही पदाधिकारी व डॉक्टर्स बारा तास उपवास आंदोलनात सहभागी होऊन आपली भूमिका विषद करणार आहे. यापूर्वी आयएमएने ‘चलो दिल्ली’चा नारा देऊन देशव्यापी आंदोलन केले होते. त्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा सत्याग्रह करण्यात येत आहे. याविषयीचे फलक सर्व दवाखान्यांमध्ये लावण्यात आले आहे.
या सत्याग्रह आंदोलनासाठी सर्व डॉक्टरांनी 2 रोजी सकाळी 9.30 वाजता आयएमए हाऊस येथे उपस्थित रहावे व सत्याग्रह यशस्वी करावा, असे आवाहन आयएमएचे सचिव डॉ.राजेश पाटील यांनी केले आहे.